आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राज्य मार्ग ३६ साठी अडीच कोटी निधी मंजूर :- आ. आशुतोष काळे

राज्य मार्ग ३६ साठी अडीच कोटी निधी मंजूर :- आ. आशुतोष काळे

            

कोपरगाव प्रतिनिधी  :---- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राज्य मार्ग ३६ वरील जेऊर कुंभारी-शिंगवे -पुणतांबा या १३ किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

                कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या राज्य मार्ग ३६ वरील जेऊर कुंभारी-शिंगवे -पुणतांबा या १३ किलोमीटर रस्त्याकडे  मागील काही वर्षापासून दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्याने प्रवास करणे जीवघेणे ठरत होते. याबाबत या गावातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधी मिळावा याबाबत प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून या रस्त्याच्या १३ किलोमीटर पर्यंतच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

        शिंगवे -पुणतांबा गावातील नागरिकांना पर्यायी मार्ग असलेला हा रस्ता अनेक दिवसापासून मजबुतीकरणाच्या प्रतीक्षेत होता. प्रलंबित असलेल्या या रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी मंजूर करून आणल्याबद्दल जेऊर कुंभारी-शिंगवे –पुणतांबा या गावातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments