Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

आमदार आशुतोष काळेंच्या योग्य नियोजनामुळे बिकट परिस्थितीत कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले- प्रांताधिकारी गोविंद शिंदे कोपरगावात कोरोना योद्ध्यांचा आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार

 आमदार आशुतोष काळेंच्या योग्य नियोजनामुळे बिकट परिस्थितीत

कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले- प्रांताधिकारी गोविंद शिंदे


कोपरगावात कोरोना योद्ध्यांचा आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार

            कोपरगांव प्रतिनिधी:---- मागील वर्षी आलेले कोरोना संकट सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च स्थानी होते. मात्र हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेल्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे कमी केले त्यामुळे घातक अशा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपाला सामोरे जाण्याची वेळ आली. मागील तीन महिन्यात परिस्थिती अत्यंत बिकट होती. दररोज शेकडो बाधित रुग्ण आढळून येत होते व बाधित रुग्णांचे मृत्यूंचे प्रमाण देखील वाढले होते. अशा कठीण परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर उभारून प्रशासनाला वेळेवर सर्व प्रकारची मदत करून केलेल्या योग्य नियोजनामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळविता आले असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

                    आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने कोरोना संकटात योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम तहसील कार्यालय कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातवतहसीलदार योगेश चंद्रेपंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधनेउपसभापती अर्जुनराव काळेमुख्याधिकारी प्रशांत सरोदेकोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधवकोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसलेग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदरतालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधातेविशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदेमहावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडामहात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचासरपंच प्रतिनिधी सूर्यभान कोळपेडॉ. दीपक पगारेडॉ. कुणाल घायतडकर,डॉ. राजेंद्र रोकडेपत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण गव्हाणेशंकरराव दुपारगुडेशैलेश शिंदेमनीष जाधवखाजगी कोविड केअर सेंटरचे प्रतिनिधी,परिचारिका प्रतिनिधीआशा सेविका प्रतिनिधी,अंगणवाडी सेविका प्रतिनिधीरुग्णवाहिका चालक प्रतिनिधीसफाई कामगार प्रतिनिधीयांच्यासह आरोग्य विभागकोपरगाव नगरपरिषदमहसूल विभागपंचायत समिती आदी विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

                              पुढे बोलतांना प्रांताधिकारी गोविंद शिंदे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढली व त्याचबरोबर ऑक्सिजन बेड, रेमडीसीवीर इंजक्शन व ऑक्सिजनची देखील टंचाई जाणवत होती.

मात्र अशा परिस्थितीत आमदार आशुतोष काळे व प्रशासन सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. रेमडीसीवीर इंजक्शन व ऑक्सिजनची उपलब्धता करा अशा सूचना प्रशासनाला करीत होते. दुसऱ्या लाटेचा मुकाबला करतांना आरोग्य विभाग व प्रशासनाने सतर्क राहून हजारो बाधित रुग्णांचा जीव वाचला आहे. मात्र आमदार आशुतोष काळे प्रशासनाच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्यामुळे व केलेल्या मदतीमुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.  

                       यावेळी बोलतांना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले कि, मागील वर्षीची कोरोना परिस्थिती व चालू वर्षाची परिस्थितीमध्ये मोठा फरक होता. फेब्रुवारी महिन्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक होती. मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. काही दिवशी तर बाधित रुग्णांच्या संख्येने द्विशतक देखील पार केले होते. मात्र ज्या-ज्यावेळी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली त्या-यावेळी तातडीने मदत करून आमदार आशुतोष काळे यांनी योग्य मार्गदर्शन केले. मागील वर्षी एकच कोविड केअर सेंटर होते यावर्षी मात्र कोपरगावमध्ये चार कोविड केअर सेंटर असून यामध्ये दोन डेडिकेटेड कोविड सेंटर आहे.  बाधित रुग्णांसाठी या सुविधा उपलब्ध होण्यामागे आमदार आशुतोष काळे यांचे मोठे योगदान आहे. कठीण परिस्थितीत ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर व एसएसजीएम महाविद्यालयात १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था केल्यामुळे परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या तालुक्यात जावे लागत होते. त्यावेळी एसएसजीएम महाविद्यालयात १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था केल्यामुळे अनेक रुग्णांना इतरत्र उपचार घेण्यासाठी जाण्याचा त्रास कमी होऊन त्या रुग्णांचे प्राण वाचले. यामध्ये आमदार आशुतोष काळे यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.

            

चौकट :-कोरोना बाधित रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या उपाय योजना करून प्रशासनाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची वेळेत पूर्तता केली त्यामुळे प्रशासनाचे काम सोपे झाले असले तरी आपल्या जीवाची पर्वा न करता बाधित रुग्णांचा जीव वाचावा यासाठी ज्या कोरोना योद्ध्यांनी योगदान दिले ते विसरून चालणार नाही. त्यांनी केलेल्या त्यागाचा यथोचित सत्कार व्हावा या उद्देशातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेसह प्रशासनावरचा मोठा ताण वाढला होता. या कोरोना योद्ध्यांनी आपला व आपल्या कुटुंबाचा विचार न करता जीवावर उदार होवून दिलेलं योगदान अजोड आहे. त्यांच्या बळावरच आपण जिल्ह्यात सर्वात अगोदर कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो. त्यामुळे यापुढे अशी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी नागरिकांनी ज्या वेळी लसीकरणासाठी बोलाविण्यात येईल त्यावेळी आपले लसीकरण करून घ्यावे.

-आमदार आशुतोष काळे

                    

 याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोमसर्व संचालक मंडळ, कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदारजिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यगोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदेराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुलेसर्व नगरसेवकपदाधिकारीपत्रकार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक उपसभापती अर्जुनराव काळे यांनी केले. सूत्रसंचालन काळे कारखान्याचे संचालक अरुण चंद्रे यांनी केल तर आभार कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम यांनी मानले

Post a Comment

0 Comments