भाजप नगरसेवक व कोल्हेंनी पोसलेले कार्यकर्ते कमी पडायला लागल्याने आता महिलांना माझ्याविरुद्ध बोलायला लावले जात आहे.--विजय वहाडणे.
पत्रकार परिषद घेऊन केला पुन्हा माजी आमदारांवर पलटवार.
![]() |
प्रतिनिधी ------ कार्यक्षम मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या निरोप समारंभातील माझे भाषण रेकॉर्ड केलेले आहे.माझ्या विरुद्ध बोलायला भाजपचे नगरसेवक कमी पडले म्हणून कि काय,आता महिलांना पुढे करून कोल्हे मला बदनाम करू पहात आहेत. असा आरोप नगराध्य विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेतकेेला तर तुमच्या धाकाने भाजप नगरसेवक निरोप समारंभासही उपस्थित राहू शकत नाहीत.माजी मुख्याधिकारी शिल्पाताई दरेकर याही कार्यक्षम होत्या यात शंकाच नाही.पण त्यांच्यावर तुमचाच दबाव होता हे सर्व जनतेलाही माहित आहे.मी त्यांचा अवमान केलेलाच नाही.फक्त अनुभव सांगितले.माजी आमदार ताईंचा मला आलेला व येत असलेला कटु अनुभव कोपरगावकर रोज अनुभवतात.मी नगराध्यक्ष झाल्यानंतर माजी आमदारांनी कोपरगाव नगरपरिषदेला एक ढबूचाही निधी दिलेला नाही व मिळुही दिलेला नाही.दिला असल्यास तसे जाहिर करावे.त्याउलट त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेला माझ्या प्रयत्नातून मिळालेला 2कोटी रुपये विशेष रस्ता निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला.तो मनमानी करून वापरला.त्यातील काही कामे 2 वर्षांपासून अपूर्ण आहेत.ती का झाली नाहीत याचे उत्तर कोण देणार?40 वर्षे कोल्हे घराण्यात आमदारकी असतांना-नगरपरिषदेत सत्ता असतांनाही शहरात महिलांसाठी एकही स्वच्छता गृह का नाही? तुमच्याकडे उत्तरच नाही.मी तरी शहरात दोन ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृह उभारले,तरी तेही कमीच आहेत असे मी मानतो.
महिलांच्या मान सन्मानाबद्दल बोलण्याचा कोल्हे गटाला नैतिक अधिकार आहे का?तुमच्या अवतीभवती असलेल्या काहींचे किस्से अजूनही शहरात चर्चिले जातात. वृत्तपत्रातूनही गाजलेले आहेत.कोल्हे यांची ईच्छा असल्यास मी त्यांची नावे घेऊनही ते किस्से सांगू शकतो.पण मला असे किळसवाणे राजकारण करायचे नाही.
मी तर जागतिक महिला दिनानिमित्त दोन वेळा कोपरगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी महिलांना बसण्याचा मान दिला.त्यात कोल्हे गटाच्या नगरसेविकाही होत्या. मी महिला नगरसेविकांशी कशा पद्धतीने वागतो-बोलतो हे तुमच्याच नगरसेविकाना विचारून बघा.आजही कोल्हे गटाच्या काही महिला नगरसेविकांचे पती किंवा सुपुत्रच नगरसेवक म्हणून वावरतात याची शरम कोल्हे गटाला वाटत नाही का?तुम्ही मला शहाजोगपणा शिकवू नका.आमदारपद गेले म्हणून कोल्हे गट राजकारणाची पातळी सोडून आरोप करत आहे. मी शहीद जवानांच्या वीर पत्नीच्या हस्ते दोन वेळा ध्वजारोहण केले.अनेक वेळा जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम महिलांच्या हस्तेच करत आहे.मी माझा वाढदिवस कोविडमुळे मृत झालेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीचा सन्मान करून साजरा केला,त्यांच्याच घरी भाजी भाकरी खाल्ली.कोल्हे गटाने भान ठेवून राजकारण करावे.महाराष्ट्र शासन आशा सेविकांना महिना फक्त एक हजार रू.मानधन देत असतांना मी सर्वसाधारण सभेत माझ्या अधिकारात विषय घेऊन या आशा भगिनींना महिन्याला प्रत्येकी दोन हजार रू.मानधन देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.
अत्याचारित मुस्लिम भगिनीला दत्तक घ्यायचे मीच जाहिर केले.मृत वेश्यांच्या 4 अनाथ मुलींना मीच स्नेहालयात दत्तक घेऊन ठेवले.
तुम्ही संजीवनी कारखान्यात किती महिलांना राखीव जागा ठेवून नोकऱ्या दिल्या हे सांगा,नंतरच माझ्याविषयी पत्रकबाजी करा.येसगाव पाटावर महिलांची विटंबना होत होती तेंव्हा तुम्ही त्याविषयी कधी बोलले का,त्यांना मदत केली का?जमलेच तर उत्तर द्या.मी स्वतःच उत्तर देत असतो.दुसऱ्यांना पुढे करत नाही
असेही प्रसिद्धीपत्रकात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी म्हटले आहे.
0 Comments