आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगांव नगरपरिषदेमार्फत मान्सुनपूर्व नाले साफसफाईचे काम प्रगतीपथावर.

 कोपरगांव नगरपरिषदेमार्फत मान्सुनपूर्व नाले साफसफाईचे काम प्रगतीपथावर.

      


कोपरगांव प्रतिनिधी:------ दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोपरगांव नगरपरिषद स्‍वच्‍छता विभागाकडून आपत्‍ती  व्‍यवस्‍थापन अंतर्गत मान्‍सूनपूर्व शहरातील मुख्य नाले व गटारी तळ लावून साफसफाई व गाळ काढण्‍याचे काम मागील 15 दिवसांपासून प्रगतीपथावर आहे. 

दरम्‍यान यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला असून जास्‍त पाऊस झाल्‍यास शहरातील मोठे नाले, गटारी तुंबु नये व पावसाचे पाणी सुरळीत वाहून जावे याकरीता नगरपरिषद स्‍वच्‍छता विभागामार्फत आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अंतर्गत मान्‍सुन आगमनापूर्वीच नाले व छोट्या मोठ्या गटारीतील गाळ काढून साफसफाई करणेचे काम हाती घेण्यात आलेले आहे. गेल्‍या 15 दिवसांपासून शहरातील खडकी, अंबिकानगर, शारदानगर, अन्‍नपुर्णानगर, वडांगळे वस्‍ती परिसर, गिरमे वस्‍ती परिसर, संजयनगर पाण्याच्‍या टाकीकडील मोठा नाला, चमडे बाजार परिसरातील नाला जेसीबी मशिनद्वारे साफसफाई करण्‍यात आला आहे. तसेच शहरातील छोट्या मोठ्या उघड्या गटारी साफसफाईचे कामदेखील चालू आहे. नाले व गटारी साफसफाई केल्‍यानंतर निघालेला गाळ व घाण ट्रॅक्‍टर व डंपर द्वारे वाहतुक करून योग्‍य ठिकाणी नेऊन टाकण्‍यात आला आहे. 

शहरातील मुख्‍य खंदकनाला गोकुळनगरीपासून तसेच साईसिटी परिसरातील नाला खडकी रोड पर्यंत व गजानननगर भागातील नाला साफसफाईचे काम सुरू करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले असून लवकरच काम सुरू करण्‍यात येणार असल्‍याची माहिती मुख्‍याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्‍याधिकारी सुनिल गोर्डे व प्रभारी स्‍वच्‍छता निरीक्षक सुनिल आरण यांनी दिली.      


Post a Comment

0 Comments