आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनील गोर्डे यांची निवड

 नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याअधिकारी सुनील गोर्डे यांची निवडकोपरगाव प्रतिनिधी:-----

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती , जिल्हा व विभागीय कार्यालयात महाराष्ट्र नगरपरिषद सेवेमध्ये कार्यरत असणार्‍या राज्य संवर्ग अधिकारी यांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांची सोडवणूक करण्याकरिता महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेची  स्थापना करण्यात आली आहे. संघटनेच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया  नुकतीच संपन्न झाली त्यात जिल्हाध्यक्षपदी कोपरगाव नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांची निवड करण्यात आली

यावेळी पुढीलप्रमाणे निवडी करण्यात आल्या.  जिल्हाअध्यक्ष :- श्री. सुनिल गोर्डे उपमुख्याधिकारी कोपरगांव न.प. ,सचिव :- श्री. अमोल दातीर पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता देवळाली न.प. , कार्याध्यक्ष :-कु. पल्लवी सूर्यवंशी कर व प्रशासकीय अधिकारी कोपरगांव न.प. , कोषाध्यक्ष :- सोमनाथ नारळकर लेखाधिकारी शेवगाव न.प. , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख :- श्री. राम सरगर शहर (बांधकाम) अभियंता श्रीरामपुर न.प., उपाध्यक्ष :- श्री. संभाजी कार्ले,श्री.अरुण तोगे,श्री. नानासाहेब टिक्कल,श्री. अभिजीत ताम्हाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नगरपरिषद , नगरपंचायत स्तरावरील कार्यकारिणीचे अध्यक्ष हे जिल्हा कार्यकारिणीचे पदसिद्ध सदस्य आहेत. नवनियुक्त कार्यकारिणी संघटनेच्या माध्यमातून प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध राहील असे यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुनील गोर्डे  यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी. सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे नगराध्यक्ष विजय वाहाडणे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे व सर्व नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments