प्राजिमा ८ च्या नुतनीकरणासाठी साठी ७ कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:------ कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार, सोनारी, मळेगाव थडी, गावातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या धारणगाव, सोनारी, चास, बक्तरपूर, वडगाव या (प्राजिमा -८) रस्त्याच्या नुतनीकरणासाठी ७ कोटी रुपये खर्चास मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील मागी काही वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या प्राजिमा – ८ या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्यावर असलेल्या सांगवी भुसार, सोनारी, मळेगाव थडी, धारणगाव, सोनारी, चास, बक्तरपूर, वडगाव या गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्या बाबत वरील गावातील नागरिकांनी या रस्त्याची दुरुस्ती करणेबाबत आमदार आशुतोष काळे यांना साकडे घातले होते. नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून आ. आशुतोष काळे यांनी त्याबाबत शासन दरबारी प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेवून या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी सात कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून या रस्त्याचे मातीभराव, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, तसेच मुरूम बाजूपट्टी, कच्चे गटर्स, नवीन पाईप मोरीचे बांधकाम करणे आदी कामे केली जाणार आहे
कोरोनाच्या संकटात आमदार आशुतोष काळे यांनी सर्व प्रकारच्या उपाय योजना करून नागरीकांचा जीव वाचविला त्याच बरोबर विकासाकडे देखील दुर्लक्ष होवू दिले नाही. सातत्याने मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणीत असून त्यामुळे मतदार संघात कोरोनाच्या संकटात देखील विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे
0 Comments