आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमदार आशुतोष काळे करणार कोरोना योद्ध्यांचा सत्कार व आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन

   आमदार आशुतोष काळे करणार कोरोना योद्ध्यांचा सत्कार व आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन

                     


कोपरगाव प्रतिनिधी:----  कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे यामध्ये कोरोना योद्ध्यांचे अजोड योगदान असून जीवघेण्या संकटात आपल्या जीवावर उदार होवून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेवून आमदार आशुतोष काळे सोमवार (दि.१४) रोजी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करणार असून याचवेळी आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.

                 मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला होता त्यामुळे दररोज बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत होती. आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करून केलेल्या उपाय योजनांमुळे बाधित रुग्णांची चांगल्या प्रकारची सोय होवून योग्य उपचार मिळाल्यामुळे हजारो रुग्ण बरे होवून सुखरूपपणे आपल्या घरी गेले आहे. यामागे कोरोना योद्ध्यांनी दिलेले योगदान व केलेला त्याग विसरून चालणार नाही. त्यासाठी संपूर्ण कोपरगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीने आमदार आशुतोष काळे पुढील आठवड्यात पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करणार आहे. यामध्ये तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. संतोष विधाते, डॉ. भाग्यश्री बडदे, तसेच पत्रकार, डॉक्टर अशा अनेक कोरोना योद्ध्यांचा सत्कार होणार आहे.


                तसेच पावसाळा सुरु झाला असून यावर्षी देखील हवामान विभागाकडून मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांपुढे अडचणी निर्माण होवू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. तरीदेखील आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना आपत्कालीन कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी आपत्कालीन कक्षाची निर्मिती करण्यात आली असून कोरोना योद्ध्यांचा सत्कार व आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन हे कार्यक्रम सोमवारी होणार आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments