आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

.ना.आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शिवसेनेकडून सर्व प्रभागात वृक्षारोपण.

 मा.ना.आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शिवसेनेकडून सर्व प्रभागात वृक्षारोपण.


कोपरगाव प्रतिनिधी:--- राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा १३ जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शिवसेना च्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले

मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे हा या आजाराला हरवण्याचा हमखास उपाय आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या सुचने नुसार यंदा वाढदिवसानिमित्त कोणताही गर्दी होईल असा कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या आदेशानुसार व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शिवसेनेच्या वतीने सर्व प्रभागात वृक्षारोपण समारंभ "सांसे हो रही है कम आओ पेड लगाये हम " हे ब्रीद वाक्य घेऊन करण्यात येणार आहे. फक्त झाडे लाऊन विसरून जाऊ नका तर त्या झाडांची निगा देखील राखा असे आदेशच जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी पदाधिकऱ्यांना दिले आहेत. 

या स्तुत्य उपक्रमामुळे कोपरगाव शहरात जवळ पास सर्वच ठिकाणी वृक्षारोपण होणार असल्याने सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे व सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments