Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

डाउच बुद्रुकच्या सरपंचपदी कोल्हे गटाच्या शोभा माळी यांची निवड

 डाउच बुद्रुकच्या सरपंचपदी कोल्हे गटाच्या शोभा  माळी यांची निवड
कोेपरगांव प्रतिनिधी:----तालुक्यातील डाऊच बुद्रुक
  ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाच्या श्रीमती शोभा मच्छिंद्र माळी यांची नुकतीच निवड झाली त्याबददल त्यांचा जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, रिपाईचे दिपक गायकवाड, माहेगांव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, कैलास धट आदि उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री. जेडगुले होते.

               श्रीमती शोभा माळी यांच्या नावाची सुचना दत्तात्रय किसन दहे यांनी केली तर त्यास बाबा दहे यांनी अनुमोदन दिले.या निवडी प्रसंगी सर्वश्री अमोल भगवान होन, धर्मा भागवत दहे, धर्मा गणपत दहे, भाउसाहेब विश्वनाथ दहे, एकनाथ भिकाजी बढे, बबन मोहन माळी, मच्छिंद्र धर्मा दहे, मच्छिंद्र गोपिनाथ माळी, एकनाथ माळी, अंकुष भिमराज गायकवाड, सतिश माळी, भास्कर माळी, भाउसाहेब माळी यांच्यासह माळी बांधवांनी मोठे परिश्रम घेतले. श्री. विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, गांव विकासात सर्वांना बरोबर घेवुन नवनिर्वाचित सरपंच शोभा माळी व सर्व सदस्यांनी काम करावे. शेवटी बाबा दहे यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments