आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी सिनिअर काॅलेजला ६ नविन अभ्यासक्रमांना मान्यता -श्री नितीन कोल्हे ग्रामिण विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

 संजीवनी सिनिअर काॅलेजला ६ नविन अभ्यासक्रमांना मान्यता  -श्री नितीन कोल्हे

   
 ग्रामिण विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी






कोपरगाव प्रतिनिधी:----- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी आर्टस्, काॅमर्स व सायन्स या सिनिअर काॅलेजला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र  शासनाकडून सहा नविन अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासुन मान्यता मिळाली असुन यामुळे ग्रामिण  विध्यार्थ्यांना  दर्जेदार व गुणवत्तापुर्ण उच्च शिक्षणाची सुविधा मिर्नाण झाली आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीन कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांसाठी  व्यावसायिक शिक्षणाबरोबरच विविध पारंपारीक शिक्षणाची दालने सुरू केलेली आहेत. आता संजीवनी सिनिअर काॅलेजला शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासुन मायक्रोबायोलाॅजी, केमेस्ट्री, झुलाॅजी व बाॅटनी या विषयांतील एम.एस.सी. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना परवानगी मिळाली आहे. तसेच सायन्स अँड  टेक्नाॅलाॅजी व मॅथेमॅटीक्स या विषयांतील बी. एस.सी. च्या अभ्यासक्रमांना परवानगी मिळाली आहे. सध्या मायक्रोबायोलाॅजी, केमेस्ट्री, झुलाॅजी व बाॅटनी या विषयांतील बी.एस.सी., बी. काॅम. (इंग्रजी माध्यम), बी.बी.ए.-आय.बी., डीप्लोमा इन फाॅरीन ट्रेड  असे अभ्यासक्रम शिकविले जातात.
संजीवनी सिनिअर काॅलेजमध्ये केवळ पुस्तकी शिक्षण न देता प्रात्यक्षिक व संशोधन  कार्यावर भर दिला जातो. तसेच विध्यार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यामुळे येथे बहुआयामी विध्यार्थी घडत आहेत, असे श्री कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे

Post a Comment

0 Comments