आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सुरेगावच्या कब्रस्थानच्या अडचणी सोडविण्याबाबत आमदार आशुतोष काळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

   सुरेगावच्या कब्रस्थानच्या अडचणी सोडविण्याबाबत आमदार आशुतोष काळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

                    






  कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील गोदावरी उजव्या तट कालव्याच्या लगत असलेल्या कब्रस्थानमध्ये मुस्लीम बांधवाना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत आशुतोष काळे यांनी पाटबंधारे अधिकारी तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

           सुरेगाव येथील गोदावरी कालव्याच्या लगत सुरेगाव, कोळपेवाडी, शहाजापूर, कोळगाव-थडी, वेळापूर आदी गावातील मुस्लीम समाजासाठीचे  कब्रस्थान आहे. या कब्रस्थानमध्ये मुस्लीम बांधवांना दफनविधी करतांना तसेच काही धार्मिक विधी करतांना येत असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच पाटबंधारे अधिकारी तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत या कब्रस्थानची पाहणी करून मुस्लीम बांधवांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी मुस्लीम बांधवांच्या वतीने सुरेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ.आय.के. सय्यद यांनी कब्रस्थानच्या अडचणी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या. गोदावरी कालव्याला आवर्तन सुरु असल्यानंतर या कब्रस्थानच्या बाजूने पाणी साचून राहते त्यामुळे कब्रस्थानमध्ये जाता येत नाही. मागील एक महिन्यापासून गोदावरी कालव्याला आवर्तन सुरु आहे. हे सलग दोन आवर्तन देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही पाणी कब्रस्थानमध्ये देखील साचले आहे त्यामुळे अडचणी वाढल्या असल्याचे सांगितले. सर्व मुस्लीम बांधवांच्या अडचणी समजावून घेत आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे अधिकारी तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत या अडचणी सोडविण्यासाठी काय उपाय योजना करता येवू शकतात याबाबत चर्चा केली. मुस्लीम बांधवांना येणाऱ्या अडचणी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी योग्य त्या उपाय योजना तातडीने कराव्या अशा सूचना दिल्या.

                     यावेळी त्यांच्या समवेत सभापती सौ. पौर्णिमाताई जगधनेउपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, एस.डी.ओ. महेश गायकवाड, शाखा अभियंता भंडारी, पंचायत समिती अभियंता दिघे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मीकराव कोळपे, उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर, कोळपेवाडीचे सरपंच संचालक सूर्यभान कोळपे, तसेच डॉ. आय. के. सय्यद, शकील पटेल, रज्जाक कुरेशी, शोएब पटेल, रफिक पठाण, रशीद शेख, बाबूलाल पठाण, फारुख पटेल, शाकीर पटेल,कौसर सय्यद आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments