जनतेसह नगराध्यक्षांनी केलेले सहकार्य हे कायम स्मरणात राहणार.------ मुख्याधिकारी प्रशांत सरोदे
“कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा पदोउन्नती व बद्दली निरोप समारंभ.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----- शुक्रवार रोजी कोपरगाव नगरपरिषद येथे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची वर्ग अ पदी पदोन्नती झाल्याने त्यांची अमळनेर नगरपरिषद येथे बदली झाली. कोपरगाव नगरपरिषद येथे दि.१४ जून २०१८ रोजी कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. नगरपरिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक या सगळ्यांसोबत काम करणे तशी तारेवरची कसरतच होती. परंतु सरोदे यांनी सर्वच पदाधिकारी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष या सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून, कोपरगाव शहर विकासाचा गाडा ३ वर्ष यशस्वी रित्या चालवला. सर्व कोपरगावकर यांची इच्छा होती की, किमान १ वर्ष तरी सरोदे साहेब मुख्याधिकारी पदी कोपरगाव नगरपरिषदेस असावेत. परंतु शासकीय नोकरी म्हटलं की पदोन्नती, बदली ओघाने आलीच प्रशांत सरोदे सारखे उमदे अधिकारी यांना पदोन्नती मिळवून ते वर्ग अ मुख्याधिकारी झालेत त्याबद्दल सर्वच पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांना आनंद झाला. परंतु त्यासोबत दुःख देखील झाले की सरोदे साहेब सारखा कर्तव्यदक्ष, उत्साही, सर्वांना सांभाळून घेणारा मुख्याधिकारी यांची पदोन्नती नंतर बदली अमळनेर नगरपरिषद येथे झाली.
सरोदे मुख्याधिकारी असताना त्यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे विविध अडचणी सोडवून यांना सातवा वेतन आयोग लागू केला. तसेच वारसाहक्काने, शासकीय नियमाप्रमाणे १८ कर्मचाऱ्यांना नगरपरिषद सेवेत सामावून घेतले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे सोबतच शहरांच्या विकासामध्ये देखील त्यांनी समतोल राखण्याचा प्रयत्न केला. सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या वॉर्डांमध्ये मागणीप्रमाणे व शासकीय नियमांना धरून शक्य असतील तेवढे विकास कामे पूर्ण केले. मग त्यात गटारी, पेव्हिंग ब्लॉक, रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, विविध भागात लिकेज असलेली पाईपलाईन दुरुस्ती, शहर स्वच्छता, कचरा विलगीकरण, यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये कोपरगाव नगरपरिषद देशातील पश्चिम विभागातून १८वे मानांकन प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आजच्या या निरोप सत्कार समारंभ प्रसंगी मुख्याधिकारी सरोदे साहेब यांच्या सोबत उत्कृष्ट असा कार्यकाळ गेल्याची खंत बोलताना उपमुख्यअधिकारी सुनील गोरडे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, डॉ.गायत्री कांडेकर तसेच गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे, तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष हिरालाल महानुभव, गटनेते वीरेन बोरावके, योगेश बागुल, स.नगरसेवक संदीप वर्पे, अपक्ष नगरसेवक महमूद भाई सय्यद त्याचबरोबर नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी बोलताना आपल्या आलेले विविध अनुभव मनोगता मधून मांडले. सरोदे यांनी सर्वांना समान न्याय देऊन कोपरगाव विकासासाठी बहुमोल असे योगदान दिले असा अधिकारी आणखी एक वर्ष आमच्या कोपरगाव शहरास पाहिजे होता अशी खंत पदाधिकारी यांनी व्यक्त केली. प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
![]() |
निरोप सत्कार समारंभ उत्तर देताना सरोदे म्हणाले कोपरगाव शहरात चा विकास साधताना माननीय नगराध्यक्ष यांनी मला खूप सहकार्य केले त्यांनी विकास कामाबाबत कधी पक्षभेद व्यक्ती भेद नगरसेवकांच्या बाबतीत केला नाही. सर्व प्रभागांमध्ये सारखीच कामे करण्याचा प्रयत्न केला. व त्या सर्वांना सर्व नगरसेवकांनी देखील तेवढीच साथ दिली. कोपरगाव चा विकास करताना विविध सर्व शासकीय अधिकारी प्रांत गोविंदजी शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, डॉ.गायत्री कांडेकर असो सर्व शासकीय विभाग या सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विकास साधण्याचा प्रयत्न केला. या कामी मला नगरपरिषदे मधील माझे सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार या सर्वांनी जीव ओतून काम केले त्यामुळेच शक्य झाले. असे मत व्यक्त करून त्यांनी सफाई कर्मचारी येथे प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. त्यांनी आमदार आशुतोषदादा काळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, उपस्थित सर्व गटनेते पदाधिकारी, नगरसेविक, सामाजिक कार्यकर्ते संजयजी काळे, आदिनाथ ढाकणे, सुशांत घोडके, सर्व पक्षाचे कार्यकर्ते शहरातील नागरिक, व्यापारी, पत्रकार, कार्यालयातील सर्व सहकारी यांचे आभार मानले
या निरोप समारंभ प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, गटनेते योगेश बागुल, विरेन बोरावके, नगरसेवक संदीप वर्पे, महमूदभाई सय्यद, मंदार पहाडे, अनिल आव्हाड, अनिलशेठ काले, मनसेचे शहर प्रमुख गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ, गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे, विद्यार्थी सहाय्यक तालुका समितीचे अध्यक्ष हिरालाल महानुभव यांच्या यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, व्यापारी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याधिकारी सरोदे यांचा सपत्नीक कोपरगाव नगरपरिषद अधिकारी कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी, नगरपरिषद शिक्षण मंडळ व एम के आढाव विद्यालय, सर्व पत्रकार, सन्माननीय नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी मनसे, शिवसेना, समता पतसंस्था बँक, आयडीएफसी बँक, इंजिनिअरिंग असोसिएशन, नगरपरिषद ठेकेदारी असोसिएशन, यासोबतच वैयक्तिक नागरिक यांनी सरोदे यांचा यथोचित सन्मान केला.
सदर कार्यक्रम कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महारुद्र गालट यांनी केले. तर आभर तुषार नालकर यांनी मानले
0 Comments