आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

हेड टू टेल शेतकऱ्यांना एकाच वेळी पूर्ण क्षमतेनेआवर्तन मिळावे यासाठी प्रयत्नशील- आ.आशुतोष काळे. शेतकरी व पाणी वापर संस्थांकडून आ. काळेंचा सत्कार

 हेड टू टेल शेतकऱ्यांना एकाच वेळी पूर्ण क्षमतेनेआवर्तन मिळावे यासाठी प्रयत्नशील- आ.आशुतोष काळे.

शेतकरी व पाणी वापर संस्थांकडून आ. काळेंचा सत्कार





कोपरगाव प्रतिनिधी:----- गोदावरी कालव्यांचे आयुर्मान शंभर वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे कालव्यांची वहन क्षमता कमी झाली त्याचा परिणाम सिंचनावर होत असल्यामुळे गोदावरी कालव्यांची दुरुस्ती हा मुख्य अजेंडा डोळ्यासमोर ठेवून केलेल्या प्रयत्नातून चाळीस कोटी रुपये निधी मिळविण्यात यश मिळाले असले तरी पुढील निधी मिळवून हेड टू टेल लाभधारक शेतकऱ्यांना एकाचवेळी पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्नशील असून पुढील कामासाठी लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ४० कोटी रुपये निधी मंजूर करून गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांची सिंचनाची मोठी अडचण दूर होणार आहे. त्याचबरोबर पाणी वापर संस्थाना देखील वेळेवर व पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी व पाणी वापर संस्थांच्या चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सत्कार केला याप्रसंगी शेतकऱ्यांशी चर्चा करतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, गोदावरी कालव्यांनी शंभरी ओलांडली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कालव्यांची वहन क्षमता वाढणे हि काळाची गरज आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदार संघात कालव्यांची दुरुस्ती केली होती. मात्र मागील पाच वर्षात दुर्दैवाने कालवा दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांची अनेक दिवसांची मागणी होती. त्या दृष्टीने केलेल्या पाठपुराव्याला जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांनी प्रत्येक वर्षी १०० कोटी याप्रमाणे कालव्यांच्या दुरुस्तीसाठी चार वर्षात ४०० कोटी रुपये निधी देण्याचे कबूल केले आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४० कोटी मिळाले असून अजून ४२ कोटी लवकरच मिळणार आहे. उजवा कालवा १२० व डावा कालवा ९० किलोमीटर पर्यंत कालव्यांची लांबी असून दुरुस्ती करण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. कालव्यांचे नूतनीकरण झाल्यांनतर वहन क्षमता वाढणार आहे. यापूर्वी वहन क्षमता कमी असल्यामुळे रोटेशन पूर्ण होण्यास लागणारा कालावधी कमी होण्यास मदत होवून पाण्याची तुट कमी होवून पाटबंधारे यंत्रणेवरचा ताण देखील कमी होईल. एकाच वेळी पूर्ण क्षमतेने हेड टू टेल शेतकऱ्यांना कालव्यांद्वारे पाणी मिळणे सहज शक्य होणार आहे. मी संपूर्ण कोपरगाव तालुका मतदार संघाचा लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे मी गट तट मानीत नाही. लोकहिताचा विचार करून लोककल्याणासाठी,जनसेवेसाठी मतदार संघाचे विकासासाठी काम करत राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,राजेंद्र खिलारीसुभाष दवंगेसतीशशेठ कृष्णाणीउमाकांत बारहाते,जगन्नाथ बागलनामदेव जाधवसय्यदबाबा शेख,नवनाथ जाधवसर्जेराव कदमरघुनाथ सिनगर,रामदास खडकाळेअजिनाथ खडकाळेशिवाजीराव शेळकेभवर गुरुजीरितेश वल्टेकैलास सिनगर,सागर खटकाळेसावळेराम खटकाळेमाधवराव खटकाळेदत्तूजी कर्डकगणेश भवरदिगंबर धुमाळ,संदीप लांडगेआबासाहेब खटकाळे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments