Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

समता इंटरनॅशनल स्कुल मध्ये आंतरराष्टीय योग दिवस उत्साहात संपन्न

 समता इंटरनॅशनल स्कुल मध्ये आंतरराष्टीय योग दिवस उत्साहात संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी:----- समता इंटरनॅशनल स्कुल हि शाळा नेहमीच विविध उपक्रमांचा आयोजनामध्ये आघाडीवर असते. शाळा जरी प्रत्यक्ष सुरु नसली तरी समताने आपल्या विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणाद्वारे विविध उपक्रमांमध्ये यशस्वीरीत्या सामावून घेतले आहे. दिनांक २१ जून रोजी समता इंटरनॅशनल  स्कूल ने  आंतरराष्टीय योग दिवसाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी समताने आपल्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना योगाचे धडे देण्यासाठी आंतरराष्टीय योग खेळाडू व प्रशिक्षक सौ. आरती पाल यांना निमंत्रित केले. आरती पाल या सध्या श्री बाबा रामदेव यांच्या हरिद्वार येथील पतंजली योग विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. आरती पाल यांनी हरिद्वार येथून समताच्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना योगाभ्यासाचे धडे दिले. यामध्ये त्यांनी सूर्यनमस्कार, भुजंगासन, शवासन, धनुरासन, श्वानासन, ताडासन , वृक्षासन, वज्रासन, शिशुपालासन इ. आसनाचे प्रात्यक्षिक दाखविले. आरती पाल यांनी केवळ या सर्व आसनांचे प्रात्यक्षिकच दाखविले नसून सर्व विद्यार्थ्याकडून शिस्तबद्धपद्धतीने हि आसने करवून घेतली. हा कार्यक्रम फेसबुक या सामाज माध्यमाव्दारे घेण्यात आला. आरती पाल यांनी योगासनाचे महत्व विशद केले. 

 समता इंटरनॅशनल स्कुलच्या मॅनेजींग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी आपल्या भाषणात योग हि जगाला भारताची देणगी आहे असे सांगितले तसेच नियमित योगा करण्याचे विविध फायदे विशद केले. त्यांनी असेही सांगितले कि योगा आपल्याला स्वत:ची ओळख करून देतो तसेच योगामुळे आपण आनंदी, प्रसन्न, शांत,  संयमी, निरोगी राहतो व निसर्गाबरोबर एकरूप होतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांनी केले. पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर सत्कार प्राचार्या सौ. लीसा बर्धन यांनी  आरती पाल यांचा शाब्दिक स्वरूपात सत्कार केला. सेकंडरी इनचार्ज सौ. शिल्पा वर्मा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख श्री. रोहित महाले तसेच क्रीडाशिक्षक श्री. उत्सव गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास दर्शकानी उदंड प्रतिसाद दिला .   

Post a Comment

0 Comments