आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

जी.प. परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वच घटकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचला –आ. आशुतोष काळे


 जी.प. परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वच घटकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचला

–आ. आशुतोष काळे
          कोपरगाव प्रतिनिधी:---- जिल्हा परिषद –पंचायत समितीमध्ये आपल्या हक्काची माणसं आपण पाठविल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण हक्काने निधी मागितला त्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामे पूर्ण झाली. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जाऊन त्याचा लाभ समाजातील गरजू लाभार्थ्यांना मिळाला असून जी.प. परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वच घटकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचला असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.


          कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या विविध योजनांअंतर्गत एकूण ३७ लाख ९२ हजार रुपये निधीतून पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधणे, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा खोली बांधणे व नागरी सुविधा केंद्र बांधकाम करणे आदी  कामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.


             यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सरपंच सुर्यभान कोळपे,  उपसरपंच डॉ. प्रकाश कोळपे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे, राहुल रोहमारे, कचरू कोळपे, राहुल जगधने, डॉ. आय.के.सय्यद, ज्ञानेश्वर हाळनोर, ज्ञानेश्वर कोळपे, वसंतराव कोळपे, हौशीराम कोळपे, महेश   कोळपे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वच सदस्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणावा एवढीच अपेक्षा होती ती अपेक्षा सर्वच सदस्यांनी पूर्ण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली याचा आनंद वाटतो. तालुक्यातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता दिली, मला विधानसभेत देखील पाठविले त्यामुळे तुम्ही टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाला प्राधान्य दिले आहे.यापुढेदेखील लोकप्रतिनिधी म्हणून विकासाचे तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली. कोळपेवाडीसह इतरही गावांच्या पाणी योजनेचे प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु असून तलावाचे सुशोभिकरन व संरक्षक कंपाऊंड साठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. प्रकाश कोळपे यांनी मानले.यावेळी जी.प.राजेश परजणे, राहुल रोहमारे, डॉ. आय. के.सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले

Post a Comment

0 Comments