आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अवघ्या ५०तासात दुहेरी खुनाच्या गुन्हा उघडकीस तीन जणांना अटक दोन जण पसार

 अवघ्या ५०तासात दुहेरी खुनाच्या गुन्हा उघडकीस तीन जणांना अटक दोन जण पसार


शिर्डी प्रतिनिधी:-----राहाता तालुक्यातील  कोराळे  गावात २५ जूनच्या मध्यरात्री शशिकांत चांगले वय ६० सिंधूबाई चांगले वय  ६० ह्या दोघांचा अज्ञात कारणावरून घरात झोपेत असताना डोक्यात फावडे टाकून गंभीर जखमी  करून खून करण्यात आला होता तशी फिर्याद मयताचा मुलगा प्रमोद चांगले यांनी राहाता पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती ह्या खुनाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गंभीर दाखल घेण्यात आली होती  ह्या खुनाच्या प्रकरणात  तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी लोणी येथे पत्रकार परिषदेत दिली

या खुनाचा  अत्यंत  शिताफीने तपास करून उपविभागीय अधिकारी संजय सातव  गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके सोमनाथ दिवटे व वीस पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू असताना गुप्त खबरीने दिलेल्या माहिती वरून सदरचा  बेंद्र्या उर्फ देबेंद्र दुतकाल्या उर्फ भारत भोसले वय २८ राहनार पढेगाब ता कोपरगाव यास ताब्यात घेत चौकशी केली असता सदरचा दुहेरी खून त्याचे साथीदार दिलीप भोसले वय १९ राहणार जवळके ता  कोपरगाव आवेल विकास भोसले रहाणार जवळके  ता कोपरगाव यांना ताब्यात घेतले असून मायकल चव्हाण   डोंगऱ्या चव्हाण रहाणार लक्ष्मीनगर कोपरगाव हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू असून चोरीच्या उद्देशाने हा खून पाच जणांनी  केल्याची कबुली त्यांनी दिली असून यातील भारत भोसले याच्यावर पारनेर बेलवडी कोपरगाव पोलीस स्टेशन मध्ये जबरी गुन्हे दाखल आहेत या तिघांना अटक करण्यात आली असून अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथक दोन दिवसापासून प्रयत्न करीत होते या दोन खुनाच्या घटने मुळे राहाता तालुक्यात मोठी घबराट पसरली होती मयत चांगले यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला न्याय द्या अशी मागणी पोलीस अधीक्षकांनी केली होती पोलीस प्रशासनाने अवघ्या तीन दिवसात गुन्हा उघडकीस आणून सर्व सामान्यांचे लोकांचे विश्वास वाढेल अश्या पद्धतीने दमदार कारवाई केली आहे ज्या पद्धतीने ह्या वयोवृद्ध दोघांचा  खून करण्यात आला त्या वरून हे खून सराईत गुन्हेगारांनी केले असल्याचा अंदाज होता ते तंतोतंत खरा ठरला या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक  दिपाली काळे पोलीस उप विभागीय अधिकारी संजय सातव गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके व राहाता पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुभाष भोये  आदींनी उघडकीस आणला आहे

अवघ्या ५०तासात दुहेरी खुनाच्या गुन्हा उघडकीस तीन जणांना अटक दोन जण पसार

Post a Comment

0 Comments