संजीवनीच्या पाॅलीटेक्निकच्या १३० विद्यार्थ्यांची सिग्मामध्ये निवड - श्री. अमित कोल्हे
ऊद्योगाभिमुख अभियंते निर्मितीमुळे संजीवनीच्या विध्यार्थ्यांना विशेष पसंती
कोपरगांव प्रतिनिधी:----- संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरींग कार्पोरेशन प्रा. लि. या वाहन ऊद्योगासाठी आवश्यक सुट्या भागांच्या उत्पादनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या कंपनीने संजीवनीच्या तब्बल १३० विद्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेवुन निवड केली असुन संजीवनी पाॅलीटेक्निक हे ऊद्योगाभिमुख अभियंते तयार करीत असल्याच्या उपलब्धीवर शिक्कामोर्तब केले. संजीवनीच्या विद्यार्थ्यांची एका पाठोपाठ एक कंपन्यांमध्ये निवड होत असल्याने ग्रामिण भागातील विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री. कोल्हे पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक त्या पैलूंची रूजवणीमुळे संजीवनी पाॅलीटेक्निक ही ग्रामिण भागातील सर्वात जास्त नोकऱ्या मिळवुन देणारी संस्था ठरत आहे. दिवसेंदिवस उद्योग जगत नवोदित अभियंत्याकडून आधुनिक तंत्रज्ञान अवगत असावे अशी अपेक्षा करीत आहे. त्यानुसार संजीवनी मध्ये प्रशिक्षण देण्यात येते. आपापल्या विद्या शाखांनिहाय ज्ञान तर दिलेच जाते, परंतु याच बरोबर संजीवनीचे विद्यार्थी जेव्हा उद्योग जगात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यात व्यक्तीमत्वाची विविध पैलु असणे तितकेच गरजेचे आहे. व्यक्तीमत्वाची सर्व पैलुही संजीवनीमध्येच विविध उपक्रमांद्वारे बिंबवली जातात. सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरींग कार्पोरेशन प्रा. लि. या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अंतिम वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील ७२, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागतील २५ व इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील ३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री. शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद, सर्व विभाग प्रमुख यांचेही अभिनंदन केले. हे सर्व विद्यार्थी अंतिम वर्षातील असुन त्यांचा अंतिम निकाल येताच ते सेवेत रूजु होणार आहे. संजीवनी मधुन पाहीजे त्या विद्यार्थाला नोकरी मिळत असल्याने पालकांची व विद्यार्थ्यांची संजीवनी मधुन पदविका अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी प्रबळ इच्छा असते. इ. १० वीचा निकाल लागणे अद्याप बाकी असताना देखिल मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक हे संजीवनीमध्ये प्रवेश मार्गदर्शनासाठी संपर्क साधत आहेे, असे श्री. कोल्हे शेवटी म्हणाले

0 Comments