आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात वृक्षारोपण

 खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात वृक्षारोपण

            

कोपरगाव प्रतिनिधी:----  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या संसदरत्न खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

              दरवर्षी खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर व तालुक्यात विविध ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमात विशेषकरून महिलांना केंद्रस्थानी ठेवून महिलांसाठी आरोग्य शिबीरविविध क्षेत्रातील नामवंत महिलांचे व्याख्यान तसेच रांगोळीपाक कला अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र मागील वर्षापासून वैश्विक कोरोना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

            







याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षानगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार,सौ.माधवी वाकचौरेसौ. मायादेवी खरेसौ. रश्मी कडूसौ.वैशाली भगतसौ. गौरी पहाडेसौ.शीतल लोंढेसौ.कोमल राठीसौ.धनश्री देवरेसौ.कीर्ती पोरवालसौ.सुवर्णा टेकेसौ.योगिता साळी आदी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments