आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण महत्वाचे - माजी मंत्री शंकररावजी कोल्हे


पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण महत्वाचे - माजी मंत्री शंकररावजी कोल्हे




कोपरगाव प्रतिनिधी:---
जागतिक तापमान वाढीमुळे सर्वत्र असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत, बेसुमार वृक्षतोड वाढल्याने प्राणवायुची मात्रा कमी पडत आहे. या परिस्थितीमध्ये पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण केले.यावेळी सहकारी महर्पी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे केन मॅनेजर गोरक्षनाथ शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर उपमुख्य शेतकी अधिकारी सी एन वल्टे आदी उपस्थित होते. यावेळी श्री कोल्हे बोलत होते, ते पुढे म्हणाले, पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे आणि वृक्षसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याची आज गरज असुन या मोहिमेमध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवावा. असेही आवाहन केले.
देषाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळाला सात वर्षे पुर्ण झाले. त्या निमित्ताने कोपरगाव मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला आहे. मतदार संघात सुरू केलेल्या या मोहिमेमध्ये माजी मंत्री कोल्हे यांनी आज वृक्षारोपण करून सहभाग नोंदविला. मतदार संघातील विविध गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने 11 हजार वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेत सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे, माजी सभापती मछिंद्र केकाण, पंचायत समिती सदस्या सौ सुनिता कैलास संवत्सरकर, माहेगाव देषमुखचे सरंपच बाळासाहेब पानगव्हाणे, शिंगणापुरच्या सरपंच सौ सुनिता संवत्सरकर, जेउर पाटोदा सरपंच सौ मनीषा सतिष केकाण, संचालक सोपानराव पानगव्हाणे, आदीसह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी, संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे युवासेवक, कायकर्ते यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments