आ. लंके यांच्या कोविड सेंटर ला अकरा हजार मदत देत सेवानिवृत्ती कार्यक्रम साजरा.
कोपरगाव बँके ऑफ बडोदातील सुरेश जायकर यांचा सेवापूर्ती सोहळा.
कोपरगाव प्रतिनिधी:------ जिद्द, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, खडतर परिश्रम या पंच सूत्रावर प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करून कमी शिक्षण असतानाही श्रीगोदा तालुक्यातील छोट्या खेड्यातून कोपरगाव मध्ये जाऊन वयाच्या २२ व्या वर्षीपासून बँक ऑफ बडोदा कोपरगाव शाखेत शिपाई पदावर मिळालेली संधी व त्या संधीचे अखंड परिश्रमातून केलेले सोने या जीवन प्रवासात नोकरी करत शिक्षण घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणारा व आपल्या कामाचा ठसा उमटवणारा बँक सेवक सुरेश महादू जायकर प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत येईल त्या संकटाला धैर्याने सामोरे जात वयाची साठ वर्षे पूर्ण करणारे व आपली बँकेची ३८ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे.
सेवा निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी देखील आपण समाजाचे काही तरी देणं लागतो या उदात्त भावनेतून अनाठायी खर्चाला फौजफाटा देत सुरेश जायकर यांनी पारनेर येथील आ.निलेश लंके यांच्या शरदचंद्र पवार करोना मंदिराला अकरा हजार रुपये मदत करत अत्यंत सध्या पद्धतीने बँकेतच कर्मचारी व कुटूंबियांच्या समवेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बँक व्यवस्थापक पुष्कराज गौतम, इंद्रप्रकाश चौधरी, शंकर दिवे, उत्कर्ष शर्मा, भारत साकीया, राहुल साळवे, आशिष बोडवाडे, द्वारकाधिश ठाकूर, गयाबाई माईंडळ, राजू गाडे, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक पवार, राहुल जाधव, राजेंद्र माळी,कुणाल जायकर, विनोद परदेशी,शैलेश शिंदे, संग्राम वाणी,राहुल देवरे,विनोद शेटे,मोबिन खान,
अर्चना जायकर आदी उपस्थित होते.
यावेळी व्यवस्थापक पुष्कराज गौतम म्हणाले की,प्रामाणिक सेवा ही सेवानिवृत्तीनंतर समाधान देते.त्याची पावती ही सेवानिवृत्तीनंतर समाजात आदर म्हणून मिळते, कामाप्रति अत्यंत प्रामाणिक व योग्य पद्धतीने काम करण्याची हातोटी सुरेश जायकर यांच्यात आहे .बँकेच्या अनेक चढ उताराचे साक्षीदार ते आहेत व त्यांच्या कामाप्रति त्यांनी असलेल्या प्रामाणिकपनामुळे बँक ऑफ बडोदा पुढील वाटचाल करत असून सुरेश जायकर यांच्या सारख्या कुटुंबातील लोकांमुळे बँकेची आज पर्यंत भरभराट झालेली आहे.
कुणाल जायकर म्हणाले की, १९८३ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितून वडिलांना बँके ऑफ बडोदात नोकरी लागली, आमच्या जन्मासह सर्व आयुष्य कोपरगावात गेले असून आम्हाला घडवण्यात सर्वात मोठा हात त्यांचा असून त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता समाजसेवेचे काम वडीलांप्रमाणेच अविरत सुरू ठेवणार आहे.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना सुरेश जायकर म्हणाले की, मी जी सेवा केली ती महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या चरणी अर्पण केली असून मला भगवंताने भरभरून दिले असून बँकेतील सर्वांनी मला सहकार्य केले आहे.
बँकेचा फायदा होईल यासाठी नेहमी प्रयत्न मी केला आहे.
बँकेतील सर्व कागद पत्र योग्य नियोजनाच्या आधारे शाखेला फायदा होईल त्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहे.
हे प्रामाणिक प्रयत्न केल्याने सर्व काही साध्य करता येते त्यामुळे माझ्यानंतर देखील सर्व शाखेतील लोकांना शिकवलेले असून जागतिक महामारी ठरलेल्या करोना मुळे कोणताही मोठा कार्यक्रम न करता आ.निलेश लंके यांच्या शरदचंद्र पवार करोना सेंटरला अकरा हजार रुपये दिल्याचेही जायकर यांनी सांगितले.
0 Comments