Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

प्रजिमा ५ च्या १६ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे

 प्रजिमा ५ च्या १६ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे

                    


कोपरगाव प्रतिनिधी:----  २०१९ ची विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे.  रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळत असून  मतदार  संघातील प्रजिमा ५ च्या १६ किलोमीटर रस्त्याच्या नूतनीकरणासाठी ४ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

        कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या प्रजिमा ५ या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्यामुळे संवत्सर,भोजडेधोत्रेरवंदेटाकळी तसेच परिसरातील गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मतदार संघातील बहुतांश रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी निवडून येताच आ. आशुतोष काळे यांनी खराब झालेल्या सर्वच रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. यामध्ये पवार गिरणी संवत्सर,भोजडेधोत्रे जिल्हा हद्द रस्ता (प्रजिमा ५) या रस्त्याच्या १६ किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण,डांबरीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दाखल केला होता. त्या प्रस्तावास सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता देवून या रस्त्यासाठी ४ कोटी रुपये निधीस मंजूरी दिली आहे. आ. आशुतोष काळेंच्या सततच्या पाठपुराव्यातून कोरोनाचे संकटात देखील या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरच या रस्त्याच्या कामास प्रारंभ होवून नागरिकांना होत असलेला त्रास संपणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून रस्त्याचा प्रश मार्गी लावल्याबद्दल सबंधित गावातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments