आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची सुशोभिकरण करण्याची मागणी

 छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची सुशोभिकरण करण्याची मागणी
कोपरगाव प्रतिनिधी :------
शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून त्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्याची मागणी कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्यावतीने मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांना निवेदन देऊन करण्यात आलेले आहे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे स्मारकातील संपूर्ण नाम पट्टी बसवावी तसेच स्मारकाच्या वरील बाजूस छत्र बसवावे आकर्षक अशी एलईडी लाईट फिटिंग करावी व आसपासचा परिसर सुशोभित करावा अशी मागणी या निवेदनात केली आहे यावेळी जन्मोत्सव समितीचे अल्पेश पवार, उदय घाडगे, गणेश मंडलिक , कृष्णा लकारे, विवेक गर्जे , सनी काळे ,विपुल गायकवाड ,शुभम भुजबळ, मयूर शिरसाट , प्रसाद शेलार ,मुकेश काळे, रणवीर लोट , साई गवळी ,प्रसाद निकम ,आकाश हलवाई, अमीर पठाण ,प्रसाद सारंगधर ,दिपक गायकवाड , शुभम गवारे, सुरज लचुरे, बाळकृष्ण जाधव , दीपक गोर्डे , सागर आगलावे आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments