संजीवनी पाॅलीटेक्निकच्या १७ विध्यार्थ्यांची शारदा मोटर्स मध्ये निवड - श्री अमित कोल्हे
विध्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्यात संजीवनी आघाडीवरकोपरगांव प्रतिनिधी:------ संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने, शारदा मोटर्स इंडस्ट्रिज या कंपनीने अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांसाठी ऑनलाइन न पध्दतीने घेतलेल्या मुलाखतींमध्ये १७ विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की बीएस ६ (भारत स्टेज सिक्स) माणकांप्रमाणे दुचाकी व चार चाकी वाहनांच्या वायु उत्सर्जन यंत्रणेसाठी व इतरही यंत्रणेसाठी सुटे भाग बनविणाऱ्या चाकण (पुणे) येथिल शारदा मोटर्स इंडस्ट्रिज लि. ही कंपनी मागील अनेक वर्षांपासून संजीवनी पाॅलीटेक्निकच्या विध्यार्थ्यांना नोकऱ्यांसाठी प्राधान्य देत आहे. या कंपनीत निवड झालेल्या विध्यार्थ्यांमध्ये चंद्रकांत राजेंद्र खेडकर, किशोर साहेबराव गोरडे, तोहिद अमिर शेख , सिध्दार्थ कैलास सांगळे, आतिश विजय उगले, अक्षय विष्णू आंधळे, यश अमरनाथ गवसणे, संगीता राजेंद्र पगारे, दिपाली मच्छिंद्र पगारे, कोमल लहु वाघमारे, अरूणा भास्कर कोळसे, आदित्य संतोष अकोलकर, साक्षी वाल्मिक कांबळे, नेहा नंदु अष्ठेकर , मेहराज अकिल शेख , अनुराग शरद डोळसे व श्रेया कृष्णा कोळगे यांचा समावेश आहे.
सध्याच्या परीस्थितीत अनेक तांत्रिक हातांना काम नाही तर अनेक तांत्रिक कामांना योग्य हात नाही. ही शोकांतिका, ऊद्योग जगत जसजसे आधुनिकतेकडे जात आहे तशी वाढत आहे. मात्र संजीवनीच्या व्यवस्थापनाने या विसंगतीची वेळीच दखल घेवुन ऊद्योग जगताला नेमके कसे मनुष्यबळ पाहीजे, या बाबीचा गांभीर्याने विचार केला, यामुळेच संजीवनी ग्रामीण भागात असुनही ग्रामीण विध्यार्थ्यांना त्यांच्या अंमित निकाला अगोदरच नोकऱ्या मिळवुन देण्यास यशस्वी होत आहे आणि वयाच्या १९ व्या वर्षी ग्रामिण भागातील मुलं-मुली कमवते होवुन कुटूंबाचा आधार बनत आहे, असे श्री कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
या सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे माजी मंत्री श्री. शंकरराव कोल्हे, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हेे आणि विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचेही अभिनंदन केले
0 Comments