आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कोपरगावात प्रभाग क्रमांक ८ व ३ मध्ये औषध फवारणी.

 राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कोपरगावात प्रभाग क्रमांक ८ व ३ मध्ये औषध फवारणी.

                 


कोपरगाव प्रतिनिधी:---  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर कोरोनामुक्त करण्यासाठी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने माझा प्रभाग, माझी जबाबदारी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. मागील आठ दिवसापासून हा उपक्रम नियमितपणे सुरु असून प्रभाग क्रमांक ८ व ३ मध्ये नुकतीच आहे. औषध फवारणी करण्यात आली आहे.

                 कोपरगाव शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढलेला संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता व बाधित रुग्णांची संख्या देखील वाढली होती. मात्र आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या उपाय योजनांमुळे रुग्णसंख्येला उतार लागला असून शहरात मोठ्या संख्येने आढळणारी बाधित रुग्णांची संख्या एकवर आली आहे. हि परिस्थिती कायमस्वरूपी राहून शहरवासियांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोपरगाव शहरात प्रत्येक प्रभागात औषध फवारणी करण्यात येत आहे. आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त औषध फवारणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून शहारत सुरु झालेले अनलॉक व कमी झालेल्या रुग्णसंख्येमुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.  

             यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचाशहराध्यक्ष सुनील गंगूलेयुवक शहराध्यक्ष नवाज कुरेशीरमेश गवळीराजेंद्र आभाळे, दिनकर खरे, अरुण शेळके, बाला गंगुले, गुरु पठाण, विक्रम वाळूंज, महेंद्र कटारनवरे, संतोष शेजवळ, गौतम गोरे, ऋषीकेश खैरनार, शंकर सोनपसारे, राजेंद्र कोपरे,सुरेश आहिरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments