आ. आशुतोष काळेंच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगरच्या
शासकीय जागेवरील रहीवाशांचा उताऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार - विरेन बोरावके
कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव शहरात शासकीय जागेवर अनेक नागरिकवर्षानुवर्षापासून राहत आहे. शहराच्या लक्ष्मीनगर परिसरातही बऱ्याच नागरिकांनी शासकीय जागेवर वास्तव्य होते. या नागरिकांनी शासकीय जागेवर बांधलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नातून लक्ष्मीनगरमध्ये शासकीय जागेवर राहत असलेल्या रहिवाशांचा उताऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असून लक्ष्मीनगर प्रमाणेच शहरातील इतर भागात शासकीय जागेवर वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांचा देखील प्रश्न मार्गी लागणार असल्याचे राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर परिसरात मागील अनेक वर्षापासून शासकीय जागेवर अनेक कुटुंब राहत आहे. ज्या शासकीय जागेवर हे कुटुंब राहत आहेत त्यांना त्यांच्या जागा शासन नियमानुसार नियमाकुल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे हा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित होता. या नागरिकांच्या जागा शासन नियमानुसार नियमित करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवकांनी सातत्याने कोपरगाव नगरपरिषदेकडे पाठपुरावा करून वेळोवेळी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत देखील या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांच्या अडचणीची दखल घेऊन आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कमिटीची बैठक घेऊन लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्व्हे करून, अतिक्रमित जागेची माहिती घेवून हे प्रस्ताव शासनाकडे दाखल केले होते. त्या प्रस्तावांची दखल घेऊन शासनाकडून प्रायोगिक तत्वावर लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवर राहत असणाऱ्या नागरिकांच्या जागेची मोजणी करण्यात आली. त्यामुळे शासकीय जागेवर राहत असलेल्या लक्ष्मीनगरच्या नागरिकांचा जागेच्या उताऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. हि समाधानाची बाब आहे. मात्र लक्ष्मीनगर प्रमाणेच कोपरगाव शहरातील टाकळी नाका, साईनाथ नगर, सुभाष नगर भाग -१,सुभाषनगर भाग -२, संजयनगर भाग -१, संजयनगर भाग -२, लक्ष्मीनगर , टिळक नगर, गोरोबा नगर,गजानन नगर, महादेव नगर भाग-१, महादेव नगर भाग-२, लिंभारा मैदान, जिजामाता उद्यान, खडकी,गांधी नगर भाग -१, गांधी नगर भाग -२,दत्तनगर, बेट भागातील २० कुटुंब व हनुमान नगर आदी भागात मागील अनेक वर्षापासून हे कुटुंब शासकीय जागेवर राहत आहे. त्या नागरिकांची शासकीय जागेवरील अतिक्रमणे लवकरात लवकर नियमाकुल करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे नगरसेविका सौ. माधवी वाकचौरे यांनी सांगितले आहे.
0 Comments