गर्जे चॅरिटेबल ट्रस्टचा लहान मुलांचे लसीकरण उपक्रम कौतुकास्पद – आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:--- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले असून या लाटेमुळे लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचे कोविड पासून संरक्षण व्हावे यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गर्जे चॅरिटेबल ट्रस्टने लहान मुलांना सवलतीच्या दरात सुरु केलेला लसीकरण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव शहरात स्व. सौ. माणिकताई चंद्रकांत गर्जे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लहान मुलांचे येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून बचाव व्हावा यासाठी सुरु करण्यात आलेल्याइन्फ्लुएन्झा लसीकरण मोहिमेचे उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात वाढलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉक डाऊन केल्यामुळे परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळविता आले असले तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारची तयारी करण्यात आली असून ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर बहुतांशी अडचणी कमी होणार आहे. तरीदेखील माझे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. गर्जे चॅरिटेबल ट्रस्टने काही दिवस सवलतीच्या दरात लहान मुलांचे लसीकरण सुरु केले आहे ज्या बालकांच्या पालकांना शक्य आहे त्यांनी आपल्या बालकाचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोयटे, डॉ. अजय गर्जे, डॉ. वरद गर्जे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, अजीजभाई शेख, युवक अध्यक्ष नवाजभाई कुरेशी, शिवसेना शहरप्रमुख कलविंदर डडियाल, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. रमेश सोनवणे,रमेश गवळी, फकीरमामु कुरेशी, राहुल देवळालीकर,आकाश डागा, अंबादास वडांगळे , इरफान शेख,चंद्रशेखर म्हस्के, बाळासाहे साळुंके, संतोष बारसे,अभिषेक उदावंत आदी उपस्थित होते
0 Comments