Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

घरमालक व रिक्षाचालकांच्या त्रासाला कंटाळून विवाहीतेची शिर्डी शहरात आत्महत्या दोन जनावर गुन्हा दाखल शिर्डी शहरात खळबळ

घरमालक व रिक्षाचालकांच्या त्रासाला कंटाळून विवाहीतेची शिर्डी शहरात आत्महत्या

 दोन जनावर गुन्हा दाखल शिर्डी शहरात खळबळ


साकुरी/शिर्डी प्रतिनिधी:----- शहरातील आपल्या मुलीला प्रियकराबरोबर पळून जाण्यासाठी मदत केली या आरोपावरून भाडेकरू असलेल्या सविता सोमनाथ गायकवाड या महिलेला शिव शिवीगाळ करून जे मारण्याची धमकी दिल्याने ते तीस वर्षीय महिला सविता सोमनाथ गायकवाड वय ३३हिने राहता जवळ प्रवासात असताना रोगोर नावाचे विष प्राशान करुन   माझ्या पत्नीने आत्महत्या केली अशी तक्रार  महिलेचा पती  सोमनाथ मल्हारी गायकवाड वय ४२ रा आंबी ता राहुरी सध्या रा नादुर्खी  महिलेच्या पतीने  शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये    १मे रोजी दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी आरोपी विनायक सोपानराव चौधरी  वय ४२रा नादुर्खी व रिक्षा चालक  रवि पवार रा शिर्डी  वर ३६या दोघांच्या विरोधात  भादवी ३०६,५०४,५०६व अनुसूचित जाती जमाती अन्वये ३/(२)(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती शिर्डी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी दिली 

 अधिक माहिती अशी की  मयत  सविता सोमनाथ गायकवाड हि पती व दोन मुली सह चौधरी वस्ती येथे ३वर्षापासुन राहत होते मुलगी बेपत्ता आहे अशी तक्रार श्री चौधरी यांनी शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये दिली होती ती पळुन जात असताना त्या प्रकरणात मयत  सविता गायकवाड  हिच्या मोबाईल चा वापर झाला होता असे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते  ती औषध उपचार घेत असताना १मे रोजी  पहाटे साईबाबा संस्थान हाॅस्पिटल मध्ये मृत्यू झाला होता  व त्यात रिक्षा चालक रवि पवार यांचा सहभाग उघड झाला होता  यात विनायक सोपानराव चौधरी याने माझ्या मुलीचा तपास लागला पाहिजे नाहीतर तुला व तुझ्या मुलिला व पतीला  सोडणार नाही अशी धमकी दिल्याने माझ्या पत्नीने टोकाचा निर्णय घेऊन  आत्महत्या केली अशी तक्रार पती सोमनाथ मल्हारी गायकवाड यांनी  शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे त्या अनुषंगाने या घटनेचा अधिक तपास   प्रभारी उपविभागीय अधिकारी राहुल मदणे हे करीत आहे मयत महिलेला काही दिवसांपूर्वीच कोरोणा झाला होता विलिनीकरणात असताना दमबाजी झाल्याने या महिलेने टोकाचा निर्णय घेतला आहे या प्रकरणात जे कोणी पाठबळ देणारे असतील त्यांचा शोध घेतला जावा विष कसे उपलब्ध झाले  विनायक चौधरी यांच्या पत्नी ला देखील गजाआड करावे अशी मागणी भारतीय विर लहुजी संघटनेचे   शिर्डी शहरातील अध्यक्ष   समीर वीर यांनी केली असुन न्याय मिळाला नाहीतर आपण जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना देखील भेटणार असल्याचे सांगितले या घटनेनंतर शिर्डी शहरात मोठी खळबळ उडाली आहे


आम्हाला न्याय हवा  

या प्रकरणात दोष नसताना माझ्या 

आईला आत्महत्या करावी लागली आमचे कुटुंब उघड्यावर आले असून आमच्या कुटुंबाला जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी महिलेची मुलगी   भाग्यश्री सोमनाथ गायकवाड हिने केली आहे


Post a Comment

0 Comments