आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला पुरस्काराची विजयाची हॅट्रिक

 राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला पुरस्काराची विजयाची हॅट्रिक  
कोपरगाव प्रतिनिधी:------ कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर बिगर शेती
सहकारी पतसंस्थेला नाशिक विभागात १ ते १० कोटी रुपयांच्या गटात सन २०१९-२० या वर्षतील प्रथम क्रमांकाचा तिसऱ्यांदा मानाचा दीपस्तंभ पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष मान.काकासाहेब कोयटे यांचे शुभ हस्ते ऑनलाइन देण्यात आला.

राघवेश्वर पतसंस्थेने कुंभारीचाच नव्हे, तर नाशिक विभागाची महाराष्ट्रात मान उंचावली. पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने संस्थेचे चेअरमन गोपीनाथ निलकंठ,अशोक वारुळे, सतीश निळकंठ यांनी स्वीकारला.

पतसंस्थेचा सुव्यवस्थित कारभार व संस्थेचा आर्थिक निकषावर म्हणजेच सहकार कायद्याच्या चौकटीत काम सातत्याने ठेव कर्ज वृद्धी कडक वसुली, थकबाकी अत्यल्प प्रमाण, योग्य व सुरक्षित गुंतवणूक सुरक्षित कर्ज वाटप, लेखा  परीक्षणात सतत अ दर्जाचा वर्ग कायम राखत कोरोना काळात ग्राहकांना दिलेली सेवा, सामाजिक काम, या गोष्टी विचारात घेऊन निवड समितीने सदर पुरस्कारासाठी निवड केली.

कुंभारी सारख्या अतिग्रामीण भागात अडीच ते तीन हजार लोकवस्ती असलेल्या लहानश्या खेडे गावात राघवेश्वर पतसंस्थेने ग्रामीण भागात ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत ३१ मार्च २०२१ अखेर ठेवी ३ कोटी ४० लाख तर कर्ज २ कोटी ४० लाख, सुरक्षित गुंतवणूक १ कोटी २० लाख, एकूण व्यवसाय ५ कोटी ८०लाख करत या आर्थिक वर्षात उलाढाल केली. ग्रामीण भागातील तळा गाळातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, गरजूंना व बेरोजगार युवकांना तसेच महिला बचत गटांना कर्ज वाटप करून त्यांचा विकास व प्रगती साधण्याचे काम केले. समाजामध्ये पत निर्माण करून दिली. हि अतिशय समाधानकारक बाब आहे.  

    या संस्थेमध्ये ग्राहकाभिमुख विविध सेवांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कोअर बँकिंग प्रणाली, एन.ई.एफ.टी.,आर.टी.जी.एस., मोबाईल कलेक्शन, एस.एम.एस  सुविधा  प्रिंटींग पास बुक, सीबील रिपोर्ट, ऑनलाइन भरणा, सोने तारण कर्ज या सुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागात नावलौकिक झाला आहे.

या प्रसंगी संस्थेचे संचालक सोपान चिने, श्रीधर कदम, बाबासाहेब देवकर, विजय गोडगे, वाल्मिक निलकंठ, ललित निलकंठ, नारायण पवार, मारुती कदम, श्रीराम घुले, संजय चंदनशिव, सुरेखा निलकंठ,अर्चना निलकंठ, नयना मनियार, सोमनाथ सोनावणे, राधु सोनावणे आदि  हे उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments