आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

नांदेड गुरुद्वारा , कोपरगाव साईबाबा तपोभूमी मंदिर व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा आदर्श सर्व धार्मिकस्थळांनी घेऊन या कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी मदत करावी – मंगेश पाटील

नांदेड गुरुद्वारा , कोपरगाव साईबाबा तपोभूमी मंदिर व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा आदर्श सर्व धार्मिकस्थळांनी घेऊन या कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी मदत करावी – मंगेश पाटील



कोपरगाव – कोरोना या जीवघेण्या महामारीतून जनतेला या मानवजातीला वाचवण्यासाठी, शासन/सरकार व्यतिरिक्त सर्वे जाती धर्मातील मंदिर , चर्च , गुरुद्वारा , मस्जित यांनी स्वतःचा असलेला खजिना , पैसा बाहेर काढून लोकांना वाचवण्याची ही वेळ ओळखून त्यांनी सर्वांनी स्वतः त्वरित पुढे यावे व या संकटातून सावरण्यासाठी हातभार लावावा अशी विनंती महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मंगेश माधवराव पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहेत मंगेश पाटील यांनी म्हंटले आहे की, जथेदार बाबा कुलवंतसिंगजी तख्त सचखंड नांदेडचे प्रमुख पुजारी यांनी ५० वर्षांपासून गुरुद्वारा मध्ये जमा झालेले , दान आलेले कोट्यवधी रुपये किमतीचे सर्व सोने , चांदी नांदेड शहरातील रुग्ण वाचवण्यासाठी, हॉस्पिटल , मेडिकल कॉलेज उभारणी साठी दिले , वापरायचे ठरवले आहे. ते रोज नांदेड जिल्ह्यातील २ लाख लोकांना जेवण त्यांच्या तर्फे देत आहे त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार 

मानवजातीला वाचवण्यासाठी हीच खरी वेळ आहे , कोरोना महामारीमुळे लोकांचे दोन वेळेच्या जेवनावाचून खूप मोठे हालहोत आहे , भारतात मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनता आहे की जी दोन वेळेच्या जेवणासाठी रोज मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या सर्वत्र लॉक डाउन असल्यामुळें तर काही कोरोना च्या भीतीमुळे ते घरीच बसून आहे. जेथे जेवायलाच काही नाही तर दवाखान्यासाठी पैसे कुठून आणणार व पैसा नसल्यामुळे दवाखान्यात जायलाही ते घाबरत आहे त्याचप्रमाणे मध्यम वर्गीय माणसे , दुकानदार , छोटे शेतकरी ही यात पोळले जात आहे.

ही सर्व परिस्थिती पाहता या साठी मंदिर , चर्च ,मस्जित गुरुद्वारा सर्वांनी पुढे येऊन रुग्ण, भक्ताला , जनतेला, मानवाला वाचवण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी आपला पैसा , सोने , चांदी , ठेवी मोडून सामाजिक सेवेसाठी पुढे यावे त्यांना दोन वेळचे जेवण आपल्या माध्यमातून कसे मिळू शकते ? आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचार कसे मिळू शकतात यासाठी त्यांनी आपल्या दानपेटी मधील संपत्ती जनकल्याणासाठी वापरावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

शीख धर्मीय हे देश सेवेसाठी मग ते सैन्यात असो की कुठेही सर्वे बाबतीत ते सदैव पुढे असतात बरोबर 100 वर्षांनी अशी महामारी आली आहे त्यांच्या प्रमाणे सर्वांनी पुढे यायची हीच खरी वेळ असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कोपरगाव साईबाबा कॉर्नर , साई तपोभूमी मंदिर व्यवस्थापन / साईबाबा मंदिर , महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट ( प्रदर्शन ) यांचे मार्फत आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातीलतील जनतेला वाचवण्यासाठी प्रदर्शन हॉल येथे 500 कोरोना बधितांसाठी कोविड केअर सेंटर उभारले. साई तपोभूमी मंदिर प्रसादालयाच्या हॉल मध्ये मागील वर्षांपासून कोरोना सुरू झाल्यापासून दररोज वाटसरू , निराधार , गराजुवंत लोकांसाठी दोन वेळचे जेवण पुरविण्याची अखंड सेवा सुरू आहे

याचप्रमाणे नांदेड गुरुद्वारा व कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांच्या ताब्यातील साई कॉर्नर येथील साईबाबा तपोभूमी मंदिर व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) करीत असलेल्या कामाचा जनसेवेचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातील छोट्या- मोठ्या धार्मिक स्थळाने घेऊन या महामारीतून सावरण्यासाठी हातभार लावावा अशी विनंतीही शेवटी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मंगेश माधवराव पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments