आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

रुग्णांच्या संख्ये इतके रेमडीसीविर इंजेक्शन पुरविण्याची विवेक कोल्हे यांची आरोग्य मंत्री ना टोपे यांचेकडे मागणी


रुग्णांच्या संख्ये इतके रेमडीसीविर इंजेक्शन पुरविण्याची विवेक कोल्हे यांची आरोग्य मंत्री ना टोपे यांचेकडे मागणी
कोपरगाव प्रतिनिधी:-----कोरोना बाधित रूग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत असून एचआरसीटी स्कोर वाढण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे डाॅक्टरांकडून रेमडीसीवीर इंजेक्षन देण्याची मागणी होत आहे, त्याचप्रमाणे इतर औषधांचाही मोठया प्रमाणात तुटवडा आहे, त्यामुळे रेमडीसीवीर इंजेक्षन उपलब्ध होत नसल्याने रूग्ण व नातेवाईकांची हेळसांड सुरू आहे, या करीता रूग्णसंख्येइतके इंजेक्षन तसेच इतर औषधांचा पुरवठा करण्यात यावा,  तसेच कमी प्रमाणात येत असलेले कोविड तपासणी किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दयावेत,  रॅपीड टेस्टची मर्यादित वेळ दिवसभर करण्यात यावी,  अशी मागणी अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक श्री विवेकभैया बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेशजी टोपे यांचेकडे केली आहे.
सार्वजनिक आरोग्य मंत्री ना राजेश टोपे यांची श्री कोल्हे यांनी मंत्रालयात भेट घेउन कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोविड परिस्थितीबाबत चर्चा केली, यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भातील निवेदन दिले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मोठी असून एचआरसीटी स्कोरचे प्रमाण झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे स्कोर वाढत असलेल्या रूग्णांना डाॅक्टर्स कडून रेमडीसीवीर देण्याची मागणी होत आहे. सदरचे रेमडीसीवीर इंजेक्षन हे प्रशासनाकडून पुरविण्यात येत आहे. हे पुरवित असतांना कोविड सेंटरला असलेली रूग्णसंख्या आणि पुरविण्यात येणारी इंजेक्षनची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे डाॅक्टर्सकडून इंजेक्षन मागणी होत आहे, परंतू सदरचे इंजेक्षन हे मार्केटमध्ये मिळत नसल्याने रूग्ण तसेच नातेवाईकांना मनस्ताप होत आहे. त्याकरीता रूग्णांच्या तुलनेत रेमडीसीवीर इंजेक्षनचा पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे इतर औषधांचाही  तुटवडा जाणवू लागल्याने याबाबत आपण उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्री कोल्हे यांनी केली.
याचबरोबर कोविड तपासणी किट कमी प्रमाणात असल्यामुळे अनेक रूग्ण तपासणीसाठी येउन किट नसल्याने तपासणीविना घरी जातात, याशीवाय रॅपिड टेस्टची वेळ मर्यादित असल्याने सर्वच संशयित रूग्णांची तपासणी होत नाही,  त्यामुळे हे सशयित रूग्ण इतरांच्या संपर्कात येउन हा आजार मोठया प्रमाणात फैलावत आहे. पर्यायाने कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोविड तपासणी किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दयावेत, रॅपिड टेस्टची असलेली मर्यादित वेळ वाढवुन दिवसभर करण्यात यावी, त्यामुळे रूग्णसंख्येला निश्चितच आळा बसेल, हेही श्री कोल्हे यांनी ना.टोपे यांच्या निदर्शनास आणून दिले.

Post a Comment

0 Comments