राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण कसे दिले जाईल याचा विचार करावा.
ऍड. योगेश खालकर.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढा चालू आहे यात अनेक युवक यांची प्राणज्योत मालवली आहे समाजातील सुशिक्षित तरुणांची अवस्था बघावी अनेक तरुणांवर बेरोजगारी चे सावटाखाली जगत आहे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे याचा गांभीर्याने विचार करून राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण कसे दिले जाईल व त्या मधून मराठ्यांचे मतपेटीत रूपांतर कसे केले जाईल याचा अभ्यास सर्व पक्षांनी करण्याचे गरजेचे आहे असे मत अॅड. योगेश खालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे त्यात पुढे म्हटले आहे की,
मला माझ्या मराठा समाजाच्या तळागाळातील गोरगरीब युवा युवतींना सांगावयाचे आहे की ज्या पक्षाचे झेंडे तुम्ही घेऊन मिळवतात त्या पक्षाच्या प्रत्येक आमदार व खासदार यांना जातीने मराठा असल्यास जाब विचारावा अन्यथा आपण पण कुठे आहोत व काहीतरी राजकीय अशा असल्याने काहीही बोलू नये, सर्व मराठा समाजाच्या लोकांनी धीर धरावा शिवाजी महाराज यांचे विचार प्रमाणे योग्य संधीची वाट बघावी.
अनेक सरकार आले व गेले परंतु प्रत्येक वेळी मराठा समाज मतदानाचं केंद्रबिंदू ठेवून त्याच्यावरती कित्येक वर्ष राजकारण चालू आहे तसेच अनेक आयोग गठित करण्यात आले हजारो बैठका पार पडल्या परंतु आज रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल यामध्ये नमूद करण्यात आले राज्य सरकारला आयोग नेमण्याचा कुठलाही अधिकार नाही वास्तविक बॅकवॉर्ड कमिशन केंद्राने नेमावे त्यांनीच राष्ट्रपतींकडे शिफारस पाठवावी असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे मला असे वाटते की सरकार ही महाराष्ट्र चालविते का ग्रामपंचायत कार्यालय चालविते का हे समजण्याच्या पलीकडे झाले आहे आहे की
सुप्रीम कोर्ट यांनी नुकतेच मराठा आरक्षणा संदर्भात निकाल दिलेला असून सुप्रीम कोर्टाचे असे मत आहे की 50 टक्के वरती आरक्षण देता येत नाही त्यामुळे मराठ्यांचे आरक्षण रद्द केले आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आहे की भारतीय जनता पक्ष हा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देत नाही ते मराठा समाजाविषयी राजकारण करीत आहे तसेच शिवसेना पक्षाची भूमिका अशी आहे की 102 वी घटनादुरुस्ती चुकीची केली असून राज्याला कुठलाही आरक्षण देण्याचा अधिकार नाही तसेच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की घटना दुरुस्ती करतेवेळी पाच ते दहा मिनिटात पटलावर ठेवण्यात आली लगेच कायदा करण्यात आला तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणत होते की कायदा आमचा फुलप्रूफ आहे तसेच भारतीय जनता पक्षाची भूमिका कायदा चुकीचा केलेला नाही हाय कोर्टामध्ये कायदा टिकला परंतु त्यांना यांना सुप्रीम कोर्टात कायदा पटवून देता आला नाही त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहेत वरील सर्व पक्षांची भूमिका ऐकल्यानंतर मी एक मराठा समाजाचा असल्याने मला या राजकीय नेत्यांना सांगायचे आहे की, तुम्ही जर राजकारण करत असेच बसला तर आगामी निवडणुकांमध्ये याची मोठी किंमत मोजावी लागली तर नवल समजू नये अशी संतप्त भावना. ही अॅड.योगेश खालकर यांनी व्यक्त केली आहे
0 Comments