कितीही कठीण काळ असला तरी संजीवनी व कोल्हे कुटुंबीय आपल्या सर्वांच्या सोबत. विवेक कोल्हे.
![]() |
कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे जगासह, देश ठप्प झाला असुन राज्यातील जनजीवनही विस्कळीत झालेली आहे. कोपरगाव तालुक्यातही या दुसर-या लाटेत रुग्णांची संख्या वाढलेली आहे. या परिस्थितीत रूग्णांना आॅक्सीजन, इंजेक्शन तसेच बेड उपलब्ध होत नाही, रूग्णांची व नातेवाईकांची मोठी हेळसांड होत असून अपु-या सुविधांअभावी उपचार घेणे जिकरीचे बनले आहे. ही सर्व परिस्थिती डोळयासमोर ठेवुन संजीवनीने पुढाकार घेत कोविड केअर सेंटर सुरू केल्याने रूग्णांना दिलासा मिळत आहे. संजीवनी कोविड केअर सेंटर हे तुमच्या सर्वांसाठी वेगळे नसून तुमचे कुटूंबच आहे आणि काळजी करू नका कितीही कठीण काळ असला तरीही वसुधैव कुटूंम्बकम या दृष्टीने संजीवनी व कोल्हे परिवार आपल्या सर्वांसोबत नेहमी उभा आहे असे युवानेते विवेक कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताच रुग्णांनी टाळयांच्या कडकडाट करत संजीवनी कोविड सेंटरला मिळणा-या सुखसुविधा बद्दल समाधान व्यक्त केले. विविध चित्रपट गीते, भजन,प्रबोधनपर गीते,विनोद यांचा सुरेल संगम या कार्यक्रमात असल्याने रुग्णांनी इथे आम्ही कुटूंबातच आहोत अशी भावना व्यक्त करत उभे राहून टाळ्या वाजवत कोल्हे कुटूंब, संजीवनी कोविड सेंटर व कलाकार यांच्या प्रति आशीर्वाद व्यक्त केले.
संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांच्या या आदर्श सेवाभाव व कार्याप्रती कलाकारांनी म्हटले की, जिथे आपली माणसे आपल्या जवळ यायला कोरोनात तयार नसतात या परिस्थितीत रुग्णांना कुटूंबाची उणीव भासू दिली जात नाहीये असे भावनिक मत व्यक्त केले. या प्रसंगी विनोदी कलाकार संदीप जाधव, गायक किरण वैराळ, संगीतसाथ गोरख कोटमे,राहुल सोनवणे,नवनाथ राजगुरू,शुभम जाधव,रमेश टोरपे,बाळासाहेब जाधव आदी. कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला
0 Comments