Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

एस एस जी एम महाविद्यालयाचे प्रा. रमेश झरेकर यांचे निधन

 एस एस जी एम महाविद्यालयाचे प्रा. रमेश झरेकर यांचे निधन कोपरगाव प्रतिनिधी:---

रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख प्रा. रमेश झरेकर यांचे १५ मे २०२१ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

प्रा. झरेकर यांनी रयत शिक्षण संस्थेत विविध महाविद्यालयातून ३० वर्ष अध्यापनाचे काम केले. एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ते प्रसिध्द होते. पुणे, कर्जत, मोखाडा व कोपरगाव या महाविद्यालयात त्यांनी अतिशय प्रामाणिक पणे अध्यापनाचे काम केले. प्रा. झरेकर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये नुकताच पीएच.डी. प्रबंध सादर केला होता.

त्यांच्या मागे त्यांची पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांना एस.एस.जी.एम. महाविद्यालय कोपरगाव, महाविद्यालय विकास समिती आणि रयत शिक्षण संंंस्थेचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.देण्यात आली.

Post a Comment

0 Comments