आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगाव नगरपरिषदेच्या वरच्या मजल्याचे काम लागणार मार्गी ४.१९ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त – आमदार आशुतोष काळे

 कोपरगाव नगरपरिषदेच्या वरच्या मजल्याचे काम लागणार मार्गी

४.१९ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त  – आमदार आशुतोष काळे

                         

कोपरगाव प्रतिनिधी:---- - कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी       वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत २ कोटी रुपये निधी मंजूर करून कोपरगाव नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आलेला आहे व कोपरगाव नगरपरिषदेच्या इतर निधीतून आवश्यक असणाऱ्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव नगरपरिषदेस ४.१९ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून कोपरगाव नगरपरिषदेच्या वरच्या मजल्याचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

                   नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या कामाला गती मिळावी यासाठी वैशिष्टपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान  ठोक तरतूद योजनेअंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार व नगरविकासमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने रुपये २ कोटी निधी मंजूर करण्यात यश मिळाले. नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीसाठी अधिक निधीची आवश्यकता असल्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या इतर निधीतून आवश्यक असणाऱ्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी शासनदरबारी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्याबाबत सतत पाठपुरावा केला.त्या  पाठपुराव्यातून खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये यापूर्वी मंजूर करण्यात आलेला २ कोटी रुपयांचा निधी व कोपरगाव नगरपरिषदेच्या इतर निधीतून २ कोटी १९ लाख असा एकूण ४.१९ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या वरच्या मजल्याचे काम सुरु होवून इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे.  कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या बगीचा सुधारणा करणेसाठी १ कोटी रुपये तसेच चोहोबाजूंनी वॉल कंपाउंडसाठी ५० लक्ष  असा १.५० कोटी निधी मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार व नगरविकासमंत्री ना. एकनाथजी शिंदे, नगरविकास राज्यमंत्री ना. प्रसाद तनपुरे यांच्या सहकार्याने कोपरगाव नगरपरिषदेला मिळाला आहे.  ज्याप्रमाणे माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, न्यायालय, पशु वैद्यकीय दवाखाना आदी इमारतींची कामे पूर्ण करून कोपरगाव शहराचे वैभव वाढविले. त्याचप्रमाणे या सर्व निधीतून कोपरगाव शहराच्या वैभवात नव्याने भर घालणारी सर्व सुविधांनीयुक्त अशी नगरपरिषदेची ईमारत उभी राहणार आहे. त्यासाठी यापुढे देखील नगरपरिषदेच्या ईमारतीच्या पुढील कामासाठी आवश्यक असणारा निधी मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments