कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे आधुनिकीकरणाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
स्पर्धेच्या युगात काळानुरूप बदल स्विकारने गरजेचे
कारखान्याची गाळप क्षमता वाढणार:आमदार आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:---- मागील६०-७० वर्षात कारखान्याची जुनी झालेली यंत्रसामुग्री त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत चालला होता. स्पर्धेच्या युगात कमीत कमी खर्चात चांगल्या प्रतीची जास्तीत जास्त साखर उत्पादन करून एक नवीन आधुनिक यंत्रसामुग्री उभारणी हि काळाची गरज असल्याचे ओळखून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यात आहे त्या प्लँटमध्ये, आहे त्या जागेतच आधुनिकीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून दोन फेज मध्ये कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या आधुनिकीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, कारखान्याच्या स्थापनेत पुढाकार घेऊन शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताला प्राधान्य देत परिसराचा विकास करण्यासाठी माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांनी आशिया खंडातील सहकारी तत्वावर कोसाकाच्या उभारणीत मोलाचे योगदान देत सहकाराची विकासगंगा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. प्रवर्तकीय संचालक मंडळात महत्वाची भूमिका पार पाडून १९५५-५६ साली पहिला चाचणी गळीत हंगाम घेतला. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या कारखान्याची सुरुवातीला ८०० मे.टनाची गाळप क्षमता होती. उसाच्या उपलब्धतेमध्ये सातत्य नसतांना देखील कारखान्याने ६६ वर्ष अविरतपणे सर्व प्रकारच्या संकटांना सामोरे जात गळीत हंगाम यशस्वी केले आहेत. मागील ६०-७० वर्षात काळानुरूप योग्य त्या मशिनरी वाढवून आवश्यकतेनुसार बदल केल्यामुळे आजरोजी कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ४ हजार मे.टन आहे. कारखान्याची जुनी झालेली यंत्रसामुग्री त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत चालला होता. स्पर्धेच्या युगात कमीत कमी खर्चात चांगल्या प्रतीची जास्तीत जास्त साखर उत्पादन करणे गरजेचे बनले होते त्यासाठी आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला. आधुनिकीकरणामुळे मनुष्यबळात व खर्चात बचत होणार आहे. कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच योग्य दर दिला आहे. यापुढेदेखील साखर उत्पादनात कमीत कमी खर्च करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षीच्या २०२०-२१ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देऊन गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली आहे. आहे त्याच फॅक्टरी प्लँटची दोन फेजमध्ये कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये प्रथमतः पहिल्या फेजमध्ये ११० मे.टन, ४५ केजी प्रेशरचा एक बॉयलर, मिल टेंडम, जनित्र संच आदींची उभारणी केली जाणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम तसेच सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीष जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी.सय्यद,असिस्टंट सेक्रेटरी एस.डी.शिरसाठ उपस्थित होते. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले तर आभार व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम यांनी मानले
0 Comments