Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांसह कोविड योध्दांचे लसीकरण होणे गरजेचे.---विजय वहाडणे

 जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांसह कोविड योध्दांचे लसीकरण होणे गरजेचे.---विजय वहाडणे

कोपरगाव प्रतिनिधी:---

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रशासकिय यंत्रणा गेल्या दिड वर्षांपासून रात्रंदिवस झटत आहेत.सर्वचअधिकारी आणि कर्मचाऱ्याना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. अशा सर्वांचे लसीकरण प्राधान्याने करावे अशी मागणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे तसेच त्यात पुढे म्हटले आहे की

पण त्यांच्याबरोबरच अनेक सामाजिक संघटना,स्वयंसेवी संस्था,समाजसेवक,काही नगरसेवक व कार्यकर्तेही कोरोना योद्धे म्हणून आपापल्या परिने कोरोनाशी लढा देत आहेत.हे काम करत असतांना काही प्रमाणात धोकाही संभवतो.म्हणून या कोरोना योध्यांचे  " लसीकरण" प्राधान्याने करणे अत्यंत गरजेचे आहे.तसे केल्यास या सर्वजण अजून जास्त हिरीरीने काम करतील यात शंकाच नाही.कोपरगाव शहरात "कोरोना वॉर रूमच्या" च्या माध्यमातून सेवा देणारे सर्व युवक,सर्व पत्रकार बंधु व अजूनही असेच काम करणाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचा निर्णय त्वरित घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून  केली आहे

Post a Comment

0 Comments