आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार – आमदार आशुतोष काळे, तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

 तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार

– आमदार आशुतोष काळे, तीन रुग्णवाहिकांचे  लोकार्पण



कोपरगाव प्रतिनिधी:--- कोरोनाच्या संकटात नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी वेळेत योग्य त्या उपाययोजना केल्यामुळे कोपरगाव तालुक्यात सकारात्मक परिणाम दिसून येत असून जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या निधितून तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला निश्चितपणे बळकटी मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी  ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढला होता. मोठ्याप्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे वेळप्रसंगी रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाताना रुग्णवाहिकेची अडचण येत होती हि अडचण दूर करण्यासाठी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन सुविधा असलेली रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून दिली होती. कोपरगाव तालुक्यासाठी रुग्णवाहिका मिळाव्या यासाठी पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश मिळून आज जिल्हा परिषदेकडून टाकळी, दहेगाव बोलका व पोहेगाव या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १५ लाखाच्या तीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहे . या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय दूर होऊन रुग्णांना बसणारी आर्थिक झळ कमी होणार आहे. कोपरगाव तालुक्याला रुग्णवाहिका दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रतापराव  शेळके यांचे आभार मानले.  

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्या सोनालीताई रोहमारे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, अनिल कदम, श्रावण आसने, कारभारी आगवन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, नगरसेवक मंदार पहाडे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, नारायण लांडगे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, राहुल रोहमारे, राहुल जगधने, बाबुराव थोरात, सुधाकर होन, किसन पाडेकर, विलास चव्हाण, रमेश गवळी, वाल्मिक लहिरे, भागवत देवकर, छगन देवकर, बाळासाहेब देवकर, लक्ष्मण थोरात, जगन्नाथ बागल,अनिल वल्टे, विशाल देशमुख, भास्कर वल्टे, दादासाहेब काकडे, भूषण वल्टे, सुनील बालसुरे, आप्पासाहेब देवकर, डॉ. वैशाली बडदे, डॉ. दीपक पगारे, डॉ. राजेंद्र रोकडे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. विलास घोलप, डॉ. नितीन बडदे, डॉ. शरद मोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments