आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमदार आशुतोष काळे यांच्या यशस्वी शिष्टाईतून कोकमठाण - रुई रस्त्याचा प्रश्न निकाली


आमदार आशुतोष काळे यांच्या यशस्वी शिष्टाईतून

कोकमठाण - रुई रस्त्याचा प्रश्न निकाली

       



 कोपरगाव प्रतिनिधी:-----  मागील तीन पिढयांपासून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण (कारवाडी) ते रुई या शिवरस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी शिष्टाई करत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांशी चर्चा करून या रस्त्याचा प्रश्न निकाली काढला असून तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व शेतकऱ्यांच्या समक्ष जवळपास एक किलोमीटरचा हा रस्ता तयार करण्यात आला आहे.   

           कोकमठाण (कारवाडी) ते रुई या शिवरस्त्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे शेतात चारा आणायला जायचे असले तरी चार-पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत असे. अनेक वर्षापासूनचा त्रास कायमचा कमी व्हावा यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम व कोकमठाण येथील शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांना साकडे घालून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा असे साकडे घातले होते. शेतकऱ्यांची होत असलेली अडचण ओळखून आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत सर्व शेतकऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेतल्या. शेतकऱ्यांचे प्रबोधन करून रस्ता तयार करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे एकमत केले. रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे कोणतेही मोठे नुकसान न होऊ देता सर्व शेतकऱ्यांच्या सहमतीतून अनेक वर्षांपासून वादग्रस्त असलेल्या कारवाडी (कोकमठाण) ते रुई शिवरस्ता नवीन १ किलोमीटर तयार वाहतुकीसाठी खुला झाला आहे. अनेक पिढ्यांपासून प्रलंबित असलेला वाद मिटून या रस्त्यावरून ट्रॅक्टर सह इतरही वाहने जावू शकतील एवढा मोठा रस्ता आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून तयार झाला आहे. रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षाचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. कोकमठाण प्रमाणे कोपरगाव मतदारसंघातील इतरही गावांमध्ये अशा प्रकारच्या रस्त्यांच्या अडचणी आहेतया अडचणी दूर करून त्या ठिकाणी नवीन रस्ता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सामंजस्यपणाची भूमिका घेवून त्या शेतकऱ्यांनी देखील कोकमठाण येथील शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आपल्या रस्त्याच्या समस्या सोडवाव्यात त्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू गावही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. हा रस्ता नकाशावर घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण करून देण्याचे आश्वासन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिले असून त्यामुळे रस्त्यावर शिक्कामोर्तब होऊन पुढील वाद टळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

               याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर  रोहोमउपसरपंच दीपक रोहोम,महेशजी लोंढेप्रसाद साबळेज्ञानेश्वर रक्ताटेसुनील साळुंकेदत्तात्रय  हाडोळेगोकुळ  डांगेजालिंदर हाडोळेधोंडीराम रक्ताटेदादासाहेव रक्ताटेमधुकर रक्ताटेअशोक बोंबेदिनकर रोहोमएकनाथ डांगे,विठ्ठलराव डांगेराजेंद्र  रोहोमगणेश कथलेमधुकर रोहोमतलाठी संदीप चाकणेग्रामसेवक डी. बी. गायकवाड आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments