आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमदार आशुतोष काळेंचा पाठपुरावा फळाला कोपरगाव शहराच्या विकासासाठी ५ कोटी निधी मंजूर

 आमदार आशुतोष काळेंचा पाठपुरावा फळाला

कोपरगाव शहराच्या विकासासाठी ५ कोटी निधी मंजूर

           





कोपरगाव प्रतिनिधी:-----  जीवघेण्या कोरोना महामारीच्या संकटात कोपरगाव विधानसभा मतदार संघात सर्व प्रकारच्या उपाययोजना करून मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करतांना कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी केलेला पाठपुरावा फळाला आला असून कोपरगाव शहराच्या विकासासाठी तब्बल ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

          कोपरगाव शहरातील नागरिकांची मागणी असलेल्या विविध कामांसाठी निधी मिळावा यासाठी नगरविकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला नगरविकास खात्याने मंजुरीची मोहोर उमटवून या विकासकामांसाठी तब्बल ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.  यामध्ये धारणगाव रोड विकसित करणे २ कोटीप्रशासकीय इमारती समोरील बगीचा सुधारणा करणे १ कोटीप्रशासकीय इमारत कंपाऊंड करणे ५० लक्षकोपरगाव शहरातील (बाजारतळ) स्मशानभूमी विकसित करणे १ कोटो, कोपरगाव शहरातील (मोहनीराजनगर) स्मशानभूमी विकसित करणे ५० लक्ष असा एकूण ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

             कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विकासकामांची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. कोपरगाव शहराच्या विकासाचे अनेक प्रस्ताव शासनदरबारी दाखल केले आहेत. कोरोना संकटाच्या काळातही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने निधी मिळाला हि समाधानकारक बाब आहे. यापुढे देखील कोपरगाव शहराच्या विकासासाठी अजूनही निधी मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले असून कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजीतदादा पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे विशेष आभार मानले आहे.

    



               

 चौकट :- कोपरगाव शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यातून कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्था अडचणीत असतांना देखील निधी मिळत आहे.याप्रमाणेच कोपरगाव शहरातील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या सहकार्याने महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माझ्या प्रयत्नांना नक्कीच  यश मिळणार आहे – आमदार आशुतोष काळे.

Post a Comment

0 Comments