आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शहरातील विकासाची कामे करायची सोडून द्वेषाचे राजकारण करू नका, तुम्ही अगोदर भाजपात किती दिवस राहणार आहे जाहीर करा.----- विनायक गायकवाड.

 शहरातील विकासाची कामे करायची सोडून द्वेषाचे राजकारण करू नका, तुम्ही अगोदर भाजपात किती दिवस राहणार आहे जाहीर करा.----- विनायक गायकवाड.


कोपरगाव प्रतिनिधी:---

         कोविडच्या संकटात चांगले काम केल्याबद्दल भाजपाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी कोपरगावचे आमदार आशुतोषजी काळे व नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचा सत्कार केला.आ.काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी ते या तालुक्याचे म्हणजे सर्वांचेच आमदार आहेत.पण त्यांचा सत्कार केल्याने " कोल्हे " यांचे पित्त खवळले.आम्ही कोल्हे यांचाही सत्कार केला असता- पण तुम्हाला आमच्याकडून झालेला सत्कार चालणार नाही हे आम्हाला माहित आहे. अशी टीका विनायक गायकवाड
योगेश वाणी,चेतन खुबाणी, किरण वडनेरे, संजय कांबळे,
मनोहर कृष्णानी, पी एम.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
तुम्ही भाजपा पदाधिकारी सुनील वाणी यांना हाताशी धरून जुन्या भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध पत्रक काढले कि सत्कार करणाऱ्यांचा भाजपाशी काहीच संबंध नाही.पदाच्या तुकड्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपात घुसलेल्यानी भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांबद्दल बोलू नये.कोल्हे यांना  आमदार काळे यांच्याबद्दल इतका द्वेष असतांना त्यांनी जिल्हा बँकेचे संचालकपद पदरात पाडून घेण्यासाठी आ.काळे यांचेशी चुंबाचुंबी का केली? तुम्ही अजूनही खा.सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात राहिलेले चालते ते कसे?
हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचेवर टिका करणारे खा.शरदरावजी पवार यांचेविरुद्ध बोलून दाखवा.धमक असेल तर सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आ.काळे यांना विरोध करूनच दाखवा.भाजपाचे खरे निष्ठावान कोण हे जनतेला माहित आहे.तुम्ही भाजपाच्या प्रदेश पदाधिकारी आहात,तुम्ही जुन्या-एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर कारवाई करा.तालुक्यात व शहरातील विकासकामे करायची सोडून द्वेषाचे राजकारण करू नका.तुम्ही अजून किती दिवस भाजपात रहाणार हे आधी जाहिर करा. असा सवालही विनायक गायकवाड, योगेश वाणी, चेतन खुबानी, किरण वडनेरे, संजय कांबळे, मनोहर कृष्णानी पी एम.पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात शेवटी केला आहे

Post a Comment

0 Comments