आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटर राज्यासाठी दिशादर्शक मॉडेल -अर्जुनराव चिखले


कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटर राज्यासाठी दिशादर्शक मॉडेल  -अर्जुनराव चिखले



कोपरगांव प्रतिनिधी:------- कोरोनाच्या महामारीत संपूर्ण विषव होरपळत आहे.आपल्या देशात व राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सुरू असलेला उच्छाद पाहता सर्व मानव जातीवर किती भीषण संकट आले आहे याची जाणीव होत असून आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढला आहे मात्र कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांनी कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारलेले जम्बो कोविड केअर सेंटर व १०० ऑक्सिजन बेडचे कर्मवीर शंकररावजी काळे कोविड सेंटर मध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सोयी सुविधा व या ठिकाणी बाधित रुग्णांना वाटत असलेला आपलेपणा त्यामुळे रुग्णांच्या विचारसरणीत सकारात्मकता निर्माण होऊन रुग्ण बरे होण्यास निश्चितपणे मदत होत असून कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरमध्ये बाधित रुग्णांना दिल्या जात असलेल्या सर्वच सोयी सुविधा उच्च प्रतीच्या व कौतुकास्पद असून हे कोविड केअर सेंटर राज्यासाठी मार्गदर्शक मॉडेल असल्याचे गौरदगार नरेगा योजनेचे उपायुक्त अर्जुनराव चिखलेसाहेब यांनी काढले.
नरेगा योजनेचे उपायुक्त अर्जुनराव चिखले यांनी मंगळवार (दि.११) रोजी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरची पाहणी करून याठिकाणी बाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी करून उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांशी संवाद साधला याप्रसंगी ते बोलत होते.ते म्हणाले की, या ठिकाणी असलेले निसर्गरम्य वातावरण,खेळती हवा,रुग्णांना दिले जाणारे रुचकर जेवण,राहण्याची उत्तम व्यवस्था,रुग्णाकडून नियमितपणे योगा करून घेतला जातो, रुग्णांसाठी एलईडी स्क्रीनवर  धार्मिक तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम व विविध व्याख्यानाचे केले जाणारे आयोजन पाहून सुखावलो गेलो असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त अर्जुनराव चिखले यांनी दिली आहे.
यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, डॉ. दीपक पगारे, डॉ. रोकडे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, नारायण लांडगे, बबनराव वाघमोडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ - कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरची पाहणी करतांना नरेगा योजनेचे उपायुक्त अर्जुनराव चिखले समवेत प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments