जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून कोपरगाव तालुक्याला १७ लाख निधी मंजूर.
-जी.प. सदस्या सोनाली साबळे
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:------ कोपरगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्याला १७ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा करून कोपरगाव तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविला आहे. त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा देखील फायदा समाजातील बहुसंख्य घटकांना मागील चार वर्षात मिळाला आहे. मागील वर्षापासून देशात व राज्यात जीवघेण्या कोरोना महामारीचा धुमाकूळ सुरु आहे. यावर्षी तर या महामारीने अधिकच उग्र रूप धारण केले आहे तरी देखील जिल्हा परिषदेकडे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरूच होते. या प्रयत्नातून समाज कल्याण विभागाच्या २० टक्के सेस फंडातून २०२०/२१ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती,जमाती व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी २३ कडबा कुट्टी मशीन, १४ इलेक्ट्रिक मोटार, ३४ शिलाई मशीन यासाठी नऊ लाख एक्याऐंशी हजार तसेच ५ टक्के सेस फंडातून अपंग लाभार्थ्यांसाठी १४ दिव्यांग व्यक्तींना स्वयं रोजगारासाठी पिठाच्या गिरणीसाठी प्रत्येकी १३,०००/-, लघु उद्योगासाठी ८ व्यक्तींना प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येकी १६,०००/- , औषध उपचारासाठी ११ व्यक्तींना प्रत्येकी २०,०००/- व बहु विकलांग ८ व्यक्तींच्या पालकांना प्रत्येकी २०,०००/- अर्थसहाय्य असे एकून १७ लाख तीस हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे यांनी सांगितले आहे
0 Comments