महाविकास आघाडी सरकार सर्वांच्यामागे खंबीरपणे उभे – आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोरोनाच्या कठीण परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार जनतेचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी धडाकेबाज निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी देखील करीत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्यामुळे रोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असतांना रुग्णवाढीचा आलेख कमी होत नव्हता. त्यामुळे शासनाला नाईलाजास्तव लॉक डाऊनचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे साहजिकच अनेकांचे रोजगार बंद पडले आहे. रिक्षा चालक व बांधकाम मजूर यांना देखील आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची जाणीव महाविकास आघाडी सरकारला असून लवकरच रिक्षा चालक व बांधकाम मजूर यांना महाविकास आघाडी सरकार कडून आर्थिक मदत देण्याचे जाहीर केलेले आहे. तसेच हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना देखील आर्थिक मदत करण्याचे शासनाच्या विचाराधीन असून त्यामुळे काळजी करू नये महाविकास आघाडी सरकार सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात कोपरगाव तालुक्याच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून कोपरगाव तालुका लवकरच कोरोनामुक्त होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोपरगाव तालुक्याला कोरोनामुक्तीकडे घेवून जाण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला सर्वोतोपरी मदत वेळेत उपलब्ध करून दिल्यामुळे कोपरगाव तालुक्यात दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबद्दल कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना विधानसभा संघटक अस्लमभाई शेख, माजी शहरप्रमुख व एस.टी. कामगार सेना अध्यक्ष भरतभाऊ मोरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग डडियाल, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफानभाई शेख, उपशहर प्रमुख विकास शर्मा, गगन हाडा, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख राहुल देशपांडे, व्यापारी सेना शहरप्रमुख योगेश मोरे, शिंगणापूर गणप्रमुख अविनाश वाघ, वाहतुक सेना शहरप्रमुख जाफरभाई शेख, गटप्रमुख रवींद्र शिंदे, गौरव चोपदार, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख अमजदभाई शेख व कोपरगाव शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना शहरप्रमुख कलविंदरसिंग डडियाल म्हणाले की, संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदार संघाला आपले कुटुंब मानले असून कटुंबप्रमुखाची जबाबदारी काय असते याचे आदर्श उदाहरण आमदार आशुतोष काळे आहेत. तालुक्याच्या जनतेची काळजी घेणारा आमदार मिळाला याचा मनस्वी आनंद होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेळेत निर्णय घेत निर्माण केलेल्या मोफत आरोग्य व्यवस्थेमुळे बाधित रुग्णांची संख्या रोडावली असून याचे सर्व श्रेय आमदार आशुतोष काळे यांना जात असून तालुक्याचा तारणहार, पालनकर्ता अशा उपमा त्यांच्यासाठी सार्थ ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चौकट :- काळे परिवाराकडे समाजकारणाचा वारसा आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने हा वारसा समर्थपणे पुढे चालविला जात असून कोरोनाच्या जीवघेण्या संकटात जनतेच्या पाठीशी ढाल म्हणून उभे राहत स्वत:ची आरोग्य यंत्रणा निर्माण करून हजारो नागरिकांचा जीव वाचविला. मागील वर्षापासून आलेल्या कोरोना महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सातत्याने प्रशासनाच्या सोबत राहून त्यांनी केलेल्या कामाला तोड नाही.
भरतभाऊ मोरे (माजी शहरप्रमुख)
0 Comments