कर्मवीर शंकररावजी काळे कोविड केअर सेंटर कोरोना बाधित रुग्णांना वरदान - शरद खरात.
कोपरगाव प्रतिनिधी:--- :निसर्गरम्य वातावरणात श्री साईबाबांच्या कृपाआशीर्वादाने पावन झालेल्या भूमीत आमदार आशुतोष काळे यांनी सुरु केलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असेलल्या कोरोना बाधित रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून अतिशय आनंद वाटत आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांची याठिकाणी घेत असलेली काळजी, नियमित आरोग्य तपासणी व याठिकाणी रुग्णांना मिळत असलेल्या उत्कृष्ट प्रकारच्या सोयी सुविधांमुळे हजारो बाधित रुग्ण बरे झाले असून कर्मवीर शंकररावजी काळे कोविड केअर सेंटर कोरोना बाधित रुग्णांना वरदान ठरले आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष व जिल्हा सल्लागार शरद खरात यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मा.खा.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्मवीर शंकररावजी काळे कोविड केअर सेंटर उपचार घेत असेलल्या कोरोना बाधित रुग्णांना कोपरगाव शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फळांचे व पौष्टिक अन्नाचे तसेच पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की, चोख व्यवस्था व रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या उच्च दर्जाच्या सोयी सुविधांमुळे आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकररावजी काळे कोविड सेंटर या ठिकाणी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. त्या दृष्टीने आमदार आशुतोष काळे यांनी उभारलेले हे कोविड सेंटर आदर्श कोविड सेंटर असून बाधित रुग्णांची आमदार आशुतोष काळे यांनी बाधित रुग्णांसाठी हक्काचे आरोग्यघर निर्माण केले त्याबद्दल शरद खरात यांनी त्यांचे आभार मानले.
सर्व मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना जेवण व फळे आणि पाणी बॉटल यांचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, डॉ दीपक पगारे, डॉ. वर्षा रोकडे,डॉ. स्वप्नील सोनवणे, नारायण लांडगे, बाबा आढाव,बबलू जावळे, उपजिल्हाध्यक्ष,अनिल बनसोडे जिल्हा कार्याध्यक्ष रणजित खरात, तालुकाध्यक्ष,पै.साईनाथ जाधव, युवा तालुका अध्यक्ष,मेजर रविंद्र अहिरे, ता.महासचिव संजय कोपरे, उपशहर अध्यक्ष, सुरेश त्रिभुवन,सामाजिक कार्यकर्ते निसारभाई शेख,राकेश गायकवाड,ऋषिकेश जगताप,सचिन बागुल,जितेंद्र गोर्डे,रोशन जराड,सिद्धेश खरात,निलेश खरात,राजू रोकडे,सचिन धुळे आदीं उपस्थित होते
0 Comments