Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची बदली करु नये. कोपरगाव मनसेची मागणी, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिले निवेदन

 कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची बदली करु नये.

 कोपरगाव मनसेची मागणी, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिले निवेदन


कोपरगाव प्रतिनिधी:------

कोपरगाव नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना कोपरगाव नगरपालिकेत 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांची बदली होणार असल्याचे समजल्याने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना मुदतवाढ देऊन त्यांची बदली करू नये या मागणीचे निवेदन कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना देण्यात आले आहे. 

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची बदली रद्द केली नाही तर तहसील कार्यालया जवळ आत्मदहन केल्या शिवाय नाही असा इशाराही मनसेच्या  वतीने तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी दिला आहे.  

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की याच अर्थाची मागणी  मी यापूर्वी ना. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली असून किमान अजून एक वर्ष कोपरगावच्या विकासासाठी प्रशांत सरोदे यांची बदली करू नका. ही मागणी मनसे च्या वतीने करून कोपरगावतील नागरिकांचे मत व्यक्त केले असल्याचे म्हणाले.

निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल, तालुका मार्गदर्शक सुनील फंड, दिव्यांग जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल,  तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या सह्या आहेत .

Post a Comment

0 Comments