आमदार आशुतोष काळेंनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाणून घेतल्या अडचणी
कोपरगाव प्रतिनिधी:---- मागील एक वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना संकटात आरोग्य विभागातील डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी आपल्या जीवाची बाजी लावून प्रत्येक कोरोना बाधित रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. आरोग्य विभाग घेत असलेल्या परिश्रमाची करीत असलेल्या त्यागाची जाणीव कायम स्मरणात राहणार आहे. तरी देखील अशा कठीण परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.
तहसील कार्यालय कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीसाठी तहसीलदार योगेश चंद्रे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुंलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशालीताई बडदे व सर्व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
कोरोना महामारीत आरोग्य विभागाला आवश्यक असलेली मदत, सहकार्य होत असले तरी अजूनही काहीं अडचणी आहेत का याची माहिती या बैठकीत त्यांनी सर्व वैद्यकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. १०० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरु झाल्यामुळे आरोग्य विभागाचा भार काहीसा हलका झाला असला तरी आपल्याला येत असलेल्या अडचणी बिनदिक्कत मांडाव्या. तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. तुम्हाला येत असलेल्या अडचणी निश्चितपणे सोडविल्या जातील असे आश्वासित केले. बाधित रुग्णांची सेवा करतांना स्वत:ची देखील काळजी घेवून रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशा सूचना दिल्या. असे त्यांनी आवाहन केले. यावेळी कोरोना परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी व बाधित रुग्णांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी तहसील कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षाला भेट देवून सूचना केल्या.
0 Comments