नगरपालिकेने ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिका खरेदी करावी. - नगरसेवकांची मागणी
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:-----
देशासह राज्यामध्ये कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच पातळयांवर विशेष प्रयत्न सुरू आहेत, कोपरगाव मध्येही दिवसागणिक वाढणारी रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करीत आहे, या संकटकाळामध्ये नगरपालिकेची रूग्णवाहिका नादुरूस्त अवस्थेत असणे निश्चितच खेदाची बाब आहे. याकरीता नगरपालिकेने तातडीने अदययावत आॅक्सीजन रूग्णवाहिका खरेदी करावी, अशी मागणी उपनगराध्यांसह भाजपा शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे केली आहे.
उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, योगेष बागुल, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, अतुल काले, बाळासाहेब आढाव, सत्येन मुंदडा, वैभव गिरमे,विवेक सोनवणे दीपक जपे, दिनेश कांबळे आदींनी मुख्याधिकारी यांची भेट घेउन वरील मागणी केली, यावेळी दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, कोपरगावमध्ये सध्या रूग्णसंख्या वाढत आहे, रूग्णालयांमध्ये आॅक्सीजन बेडची कमतरता भासत आहे. रूग्णांना आॅक्सीजनची गरज भासल्यास रूग्णांना इतर शहरातील रूग्णालयात हलविण्याची गरज पडत आहेे, या परिस्थितीमध्ये नगरपालिकेची रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने शहरवासीयांची मोठी कुचंबना होत आहे. वाढत्या रूग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्था, उद्योजक यासाठी प्रयत्न करत आहे.
त्यामुळे सदयपरिस्थितीचा विचार करून राप्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत कोपरगाव नगरपरिपद संचलीत भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम रूग्णालयाकरीता नगरपरिपद फंडातुन अदययावत आॅक्सीजन युक्त रूग्णवाहिका खरेदी करून रूग्णांसह नातेवाईकांची होणारी गैरसोय दूर करावी, अषी मागणीही निवेदनात केली आहे. या निवेदनावर नगरसेविका ताराबाई जपे, दिपाताई गिरमे, रेखाताई काले, सुवर्णाताई सोनवणे, ऐष्वर्याताई सातभाई, मंगलताई आढाव, हर्पाताई कांबळे, विदयाताई सोनवणे, भारतीताई वायखिंडे, नगरसेवक संजय पवार, जनार्दन कदम,विजय वाजे, आरिफ कुरेषी, शिवाजी खांडेकर, अनिल आव्हाड, कैलास जाधव, सत्येन मुंदडा आदींच्या सहया आहेत
0 Comments