आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये खाजगी रुग्णालयांचा समावेश करण्यात यावा-सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची आरोग्यमंत्री ना.राजेशजी टोपे यांच्याकडे मागणी

 महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये खाजगी रुग्णालयांचा समावेश करण्यात यावा-सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची आरोग्यमंत्री ना.राजेशजी टोपे यांच्याकडे मागणी.
कोपरगाव प्रतिनिधी-:---राज्यात आलेल्या कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.मध्यतंरीच्या काळात रुग्णांची संख्या झपाटयाने वाढल्याने पुरेशा वैद्यकीय सुविधांअभावी अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागले,खाजगी रुग्णालयांकडून आकारल्या गेलेल्या बीलांमुळे रुग्ण व नातेवाईकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे त्याकरीता खाजगी रुग्णालयाचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करावा,अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.टोपे यांचेकडे केली आहे.

      कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे सर्वांधिक आर्थिक फटका हा सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना बसलेला असून कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे नागरिकांना सरकारी रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांनी उपचार कोठे घ्यायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे बहुतांश रुग्णांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले असून उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात मोठी किंमत मोजावी लागलेली आहे.त्यातच अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची असल्यामुळे काहींनी कुटुंबातील महिलांचे दागीने मोडून किंवा गहाण ठेऊन उपचार केलेले आहे मात्र या परिस्थितीमुळे कोरोना बाधीत रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांवर मोठा आर्थिक ताण पडलेला असून कोरोनाच्या दुस-या लाटेत विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी व मजुरांवर याचा परिणाम झालेला असून काही रुग्णांना पैशाअभावी उपचार न मिळाल्यामुळे आपल्या प्राणासही मुकावे लागले आहे.

          गेल्या एक ते दीड वर्षापासून कोरोना महामारीने लॉकडाऊन असल्यामुळे कुंटुबांचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत असतांना कोरोनाची लागण झालेल्या बहुतांश नागरिकांना उपचार कसे करायचे ही समस्या त्यांच्यापुढे निर्माण झालेली आहे.त्यातच राज्यातील खाजगी रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट नसल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याने खाजगी रुग्णालयांचा समावेश या योजनेत केल्यास ब-याचशा रुग्णांना त्याची निश्चितच मदत होईल जेणेकरुन सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना उपचार करणे सोयीचे होऊन त्यांना आपला जीव वाचविण्यास मदत होणार आहे त्यामुळे खाजगी रुग्णालयांचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करावा अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments