Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

सामाजिक बांधिलकी जपत कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

 सामाजिक बांधिलकी जपत कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने  दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न       

  कोपरगाव प्रतिनिधी:-----

तालुक्याचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार आशुतोष काळे  यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून   कुंभारी ग्रामपंचायतनी दिव्यांग बांधवांसाठी     आवश्यक साहित्य फॅन्  सॕनिटायझर आदींचे वाटप करण्यात आल्याची माहितीकुंभारी ग्रामपंचायतचे लोकनियूक्त सरपंच प्रशांत घुले उपसरपंच दिगंबर बडे  यांनी दिली तसेच याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की

आज करोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना माननीय आमदार साहेब यांच्या वतीने प्रत्येक कुटुंबामध्ये सॕनीटायझर वाटप नुकतेच करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कुंभारी च्या कोरोनाचा समितीच्यावतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानामध्ये तिसरा टप्पा पूर्ण गावाची तपासणी पार पाडण्यात आली त्याचबरोबर गावात माननीय पोलीस पाटील उल्लास मेढे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संसर्ग जनजागृती फलक गावाच्या मध्यवर्ती भागात लावण्यात आला  हे सर्व करत असताना ग्रामपंचायत कुंभारी च्या वतीने दिव्यांग बांधवांनी आवश्यक साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले विकासाकडे वाटचाल करत असताना सरपंच प्रशांत घुले यांनी औषध फवारणी जनजागृती मोहीम लसीकरणाबाबत विशेष आवाहन   आदी उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन ग्रामस्थांना आवाहन केले आहे कुंभारी ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी

ग्रामपंचायत सदस्य किशोर पवार,ललित निळकंठ ,सौ किरण  गायकवाड , सुनील चदंनशिव ,अशिष थोरात,वसंत घुले आदी ग्रामस्थ ,रमण गायकवाड , सुनील कदम,प्रकाश डांगे,ग्रामसेवक कासवे भाऊसाहेब ,ग्रामपंचायत कर्मचारी निता कदम,पैठणे ताई,रवी व्हरे,सागर लुटे आधी यावेळी उपस्थित होते     

,

Post a Comment

0 Comments