आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णाना मोफत ऑक्सीजन सुविधा. - श्री विवेकभैया कोल्हे यांची माहीती

 संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णाना मोफत ऑक्सीजन सुविधा. - श्री विवेकभैया कोल्हे यांची माहीती 

 


    कोपरगाव प्रतिनिधी:------    
उपचारादरम्यान रूग्णांची अचानक खालावणारी तब्बेत, या दरम्यान आरोग्य सुविधां उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे नागरीकांची मोठया प्रमाणात हेळसांड होत असल्याने संजीवनी उदयोग समुहामार्फत संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करण्याचे काम सुरू आहे, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन  बेडची मोठया प्रमाणात कमतरता जाणवत असल्याने संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये मोफत ऑक्सिजन बेड सुविधा सुरू करण्यात आली आहे. अशी माहीती जिल्हा बॅकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.
       आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये सुरू करण्यात आलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे 40 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 20 ऑक्सिजन काॅन्सनट्रेटर व 20 ऑक्सिजन सिलेंडरद्वारे रूग्णांना सेवा दिली जाणार आहे. ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असुन श्री कोल्हे यांनी पहाणी केली, उपस्थित वैदयकिय अधिका-याकडून या व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी श्री कोल्हे पुढे म्हणाले, संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष श्री बिपीनदादा कोल्हे आणि माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये सध्या अनेक रूग्ण उपचार घेत आहे, परंतु अनेक रूग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासत असल्याने ही सुविधा तातडीने मिळत नाही, सहजासहजी ऑक्सिजन  बेड उपलब्ध होत नाही, रूग्ण व नातेवाईकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. त्यादृष्टीकोनातून ही सुविधा सुरू करण्यात आली असून यापुढेही आणखी 40 ऑक्सिजन बेड सुरू करण्याचा आमचा मानस आहे. या सेंटरमधून अनेक रूग्ण बरे होउन घरी गेलेले आहे. एचआरसीटी स्कोर 12 पर्यंत असलेले रूग्णही या ठिकाणाहून बरे झाले आहेत. ही समाधानाची बाब असून रूग्णांना गरजेच्या असलेल्या फेबीपिरावीर सारख्या टॅबलेटसचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. संजीवनी उदयोग समुहाच्या माध्यमातून येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना फेबीपिरावीर सारखे महागडी औषधेही कमी दरात उपलब्ध करून दिली जात असुन गरजूंना ही औषधे
 मोफत दिली जाणार आहे. यासाठी उत्पादीत कंपनीशी संपर्क साधून  औषधे उपलब्ध केली असल्याचे श्री कोल्हे म्हणाले.याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पाासाहेब दवंगे,अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, नगरसेवक सत्येन मुंदडा, सुषांत खैरे, प्रमोद नरोडे डाॅ जाधव, डाॅ कृप्णा पवार आदी उपस्थित होते.

संजीवनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची उत्तम सेवा. डॉ. कृष्णा पवार
चौकट - आरोग्य सुधारत असतांना अचानक ऑक्सिजन पातळी खालावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तातडीने रूग्णांस ऑक्सिजनची गरज भासल्यास ऑक्सिजन  बेडची सुविधा संजीवनी कोविड सेंटरने सुरू केली असल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे रूग्णांना बरे करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न या ठिकाणी सुरू असुन स्वच्छता, पौष्टीक आहार आणि विरंगुळा मिळावा म्हणून केलेल्या उपाययोजना निश्चितच  उल्लेखनीय आहे.
डाॅ.कृष्णा पवार

Post a Comment

0 Comments